WhatsApp सतत युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतो. जगातील लोकप्रिय इन्स्टंट ऍप असल्यामुळे युजर्स देखील नवनवीन फीचर्सबाबत भरभरून पसंती दर्शवतात. काही काळापासून युजर्स एका खास फीचरची मागणी करत होते. अखेर ऍपने त्यावर बीटा टेस्टिंग सुरु केली आहे. WhatsApp लवकरच कॉन्टॅक्ट एडिट फिचर सादर करेल, अशी अपेक्षा आहे. बघुयात सविस्तर-
सध्या WhatsApp वर कोणतेही कॉन्टॅक्ट एडिट करता येत नाही. युजरला फोन कॉन्टॅक्टमध्ये जाऊन एखादा संपर्क एडिट करावा लागतो. मात्र, आता लवकरच ऍप समस्या सोडवणार आहे. यासाठी ऍपमध्ये नवीन फिचर आणले जात आहे, जेणेकरून ऍपमध्येच काँटॅक्ट्स एडिट करता येतील. अहवालानुसार, हे फिचर आधी अँड्रॉइड युजर्सकरता आणले जाईल.
नव्या फिचरसह म्हणजेच कॉन्टॅक्ट एडिट फीचरसह केवळ कॉन्टॅक्टच एडिट करण्याची सोय असेल, असे नाही. ऍप यासह काही अप्रतिम सुविधा देखील जोडणार आहे. जेणेकरून वापरकर्ते आपल्या काँटॅक्ट्सचा बर्थडे कधीही विसरणार नाही. खरं तर, WhatsApp च्या नव्या फीचर्ससह काँटॅक्ट्ससोबत त्यांचे बर्थडे आणि त्यांचे ईमेल- ID लिंक करण्याची सोया असणार आहे. त्यामुळे, मित्रांचे बर्थडे लक्षात ठेवणार आता अवघड राहिलेले नाही. आता तुम्ही वेळेवर तुमच्या काँटॅक्ट्सना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकणार आहात.
आम्ही तुम्हला सांगतो की, WhatsApp युजर इंटरफेस लवकरच बदलणार आहे, अशा चर्चा सर्वत्र सुरु आहेत. ज्यामध्ये वरील बाजूस दिसणाऱ्या बारला खालच्या बाजूस शिफ्ट केले जाऊ शकते, असे म्हटले जात आहे.