WhatsApp च्या ‘या’ युजर्ससाठी Security साठी येणार नवीन फीचर, कुणीही वाचू शकत नाही तुमचे वैयक्तिक चॅट। Tech News

Updated on 31-Jan-2024
HIGHLIGHTS

WhatsApp ने यूजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन चॅट लॉक फीचर सादर केले.

WhatsApp वेब वापरकर्त्यांसाठी एक नवीन चॅट लॉक फीचर आणत आहे.

आता वेब वापरकर्ते सुद्धा आपल्या वैयक्तिक चॅट्स अधिक सुरक्षित करू शकतात.

काही काळापूर्वी WhatsApp ने यूजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन चॅट लॉक फीचर आणले होते. या फीचरद्वारे अँड्रॉइड आणि iPhone वापरकर्ते त्यांच्या वैयक्तिक चॅट सहज लॉक करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, आता ही सुविधा वेब वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. कारण आता वेब वापरकर्ते सुद्धा आपल्या वैयक्तिक चॅट्स अधिक सिक्योरिटीमध्ये ठेऊ शकतात. बघुयात सर्व तपशील-

WhatsApp चॅट लॉक फिचर

WhatsApp च्या आगामी फीचर्सचा मागोवा घेणाऱ्या wabetainfo या वेबसाइटकडून ही माहिती मिळाली आहे. अलीकडेच wabetainfo ने आपल्या एका रिपोर्टमध्ये सांगितले की, WhatsApp वेब वापरकर्त्यांसाठी एक नवीन चॅट लॉक फीचर येत आहे. याद्वारे, वापरकर्ते त्यांच्या चॅट्स लॅपटॉप आणि कंप्युटरवर चॅट्स लॉक करू शकतील. यासाठी यूजर्सना WhatsApp मध्ये एक वेगळा टॅब मिळणार आहे. याद्वारे लॉक फीचर वापरणे तुमच्यासाठी अगदी सोपे होणार आहे.

WhatsApp chat

एवढेच नाही तर, हा टॅब हाईड करण्याची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की, वेब वापरकर्त्यांसाठी आगामी चॅट लॉक फिचर स्मार्टफोनमध्ये उपलब्ध फिचरप्रमाणेच काम करेल. हे फिचर वापरकर्त्यांना अतिरिक्त सिक्योरिटी लेव्हल आणि प्रायव्हसी ऑफर करणार आहे. हे सिक्योरिटी टूल वेब वापरकर्त्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.

काही वेळा असे होते की, तुम्ही डेस्कटॉपवर WhatsApp ओपन करून लॉग आऊट करत नाही. अशा परिस्थितीत तुमचे वैयक्तिकी चॅट्स इतर कुणीही सहजपणे वाचू शकतो. यामुळे तुम्ही नक्कीच अडचणीत येण्याची शक्यता असते. पण आता काही काळजी करण्याची गरज नाही, कारण नवे फिचर तुमची वैयक्तिक सुरक्षा वाढवणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, WhatsApp चे चॅट लॉक फीचर सध्या बीटा यूजर्ससाठी उपलब्ध आहे. या फिचरची चाचणी सुरू आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर, हे फिचर लवकरच जगभरातील वापरकर्त्यांसाठी आणले जाईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :