WhatsApp हा जगभरात सर्वात जास्त वापरला जाणारा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. हा असा एक प्लॅटफॉर्म आहे जो तुम्हाला अगदी मोफत वापरता येतो. पण WhatsApp युजर्ससाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. WhatsApp वापरण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार असल्याची चर्चा आहे. मात्र, तुम्हाला WhatsApp वापरण्यासाठी नाही तर, तुम्हाला त्याच्या बॅकअपसाठी पैसे खर्च करावे लागतील.
आतापर्यंत WhatsApp बॅकअप गुगल ड्राइव्हच्या सामान्य स्टोरेजपेक्षा वेगळे मोजले जात होते. पूर्वी गुगल ड्राइव्हवर फ्री स्पेस मिळायची, आता ही जागा 15GB पर्यंत मर्यादित आहे. मात्र, WhatsApp बॅकअप या कॅपचा भाग नव्हता.
हे सुद्धा वाचा: Redmi 12C Discount: 14 हजार रुपयांचा स्मार्टफोन अगदी निम्म्या किमतीत खरेदी करा, बघा Best ऑफर
अहवालानुसार, कंपनी आपले धोरण बदलत आहे आणि आता WhatsApp बॅकअप हा Google Drive च्या 15GB फ्री स्पेसचा भाग असेल. वापरकर्त्यांसाठी 15GB फ्री स्पेस आधीच युजर्सना कमी पडतोय. यावर त्यांचे फोटो, मेल आणि इतर तपशील सेव्ह असतात. त्यामुळे, WhatsApp बॅकअप यात ठेवल्यास स्टोरेज आणखी वेगाने फुल होते. आम्ही तुम्हाला सांगतो की, WhatsApp हे अपडेट बीटा यूजर्ससाठी जारी करत आहे. अहवालानुसार, कंपनी 2024 च्या पहिल्या तिमाहीत हे अपडेट जारी करेल.
लक्षात घ्या की, तुमची 15GB स्टोरेज फुल झाल्यास तुम्हाला अतिरिक्त जागा खरेदी करावी लागेल, जी Google One प्लॅनच्या स्वरूपात येईल. यासाठी तुम्हाला मंथली पेमेंट करावे लागणार आहे.
Google One बेसिक, स्टँडर्ड आणि प्रीमियम अशा तीन प्लॅन्ससह येतो. या सर्व प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना मासिक शुल्कावर स्टोरेज मिळेल.
बेसिक प्लॅनमध्ये यूजर्सना 130 रुपयांमध्ये 100GB स्पेस मिळते. तर स्टँडर्ड प्लॅन 210 रुपयांना येतो, ज्यामध्ये वापरकर्त्यांना 200GB जागा मिळते. तर, Google One च्या प्रीमियम प्लॅनची किंमत 600 रुपये इतकी आहे, ज्यामध्ये एकूण 2TB डेटा उपलब्ध असेल.
सध्या या प्लॅन्सवर ऑफर देखील सुरु आहे, त्यानुसार तुम्ही बेसिक प्लॅन 35 रुपये/मन्थ, स्टॅंडर्ड प्लॅन 50 रुपये/मन्थ आणि प्रीमियम प्लॅन 160 रुपये/मन्थनुसार खरेदी करू शकता. अशाप्रक्रारे तुम्ही फ्री स्पेस खरेदी करू शकता, जेणेकरून तुम्हाला WhatsApp बॅकअपची काळजी करण्याची गरज नाही.