WhatsApp ने नवीन फीचर 'चॅनल' फिचर लाँच केले आहे. कंपनीचा दावा आहे की, ते खाजगीरित्या वापरकर्त्यांना लोक आणि ऑर्गनायझेशनचे महत्त्वाचे अपडेट्स वितरीत करेल. याद्वारे येथेही तुम्ही इन्स्टाग्रामप्रमाणे फॉलोअर्स बनवू शकता. WhatsApp वर 'स्टेटस'सह 'अपडेट्स' नावाचा वेगळा टॅब मिळेल. येथून वापरकर्ते आवडते चॅनेल फॉलो करू शकणार आहेत. मात्र, हे फिचर सध्या परदेशात लाँच झालेले आहे, लवकरच भारतीय युजर्ससाठी फीचर्स आणले जाईल.
WhatsApp चॅनेल हे एक वन वे कम्युनिकेशन टूल आहे. चॅनल ऍडमिन एकाच वेळी असंख्य वापरकर्त्यांसह टेक्स्ट, फोटो, व्हिडिओ, स्टिकर्स आणि पोल शेअर करण्यास सक्षम असतील. मात्र, यात तुम्हाला रिप्लाय देता येणार नाही. Whatsapp ने चॅनलसाठी अपडेट्स हा नवीन टॅब जोडला आहे. नवीन टॅबमध्ये यूजर्स चॅनलचे मेसेज आणि अपडेट्स पाहू शकतील.
चॅट, ईमेल किंवा ऑनलाइन पोस्टमध्ये पाठवलेल्या लिंकद्वारे तुम्ही चॅनेल जॉईन करू शकता. याशिवाय कंपनी एक डिरेक्टरीही बनवत आहे. यासह छंद, क्रीडा किंवा लोकल अधिकारी असे विविध चॅनेल शोधणे सोपे होईल. नवीन डिरेक्टरीमध्ये लोक त्यांच्या आवडीनुसार चॅनेल शोधू शकतील. चॅनलसमोर 'प्लस' चे चिन्ह असेल, त्यावर क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता.
प्रायव्हसी म्हणून चॅनेलचे फॉलोअर्स ऍडमिनचे प्रोफाइल किंवा फोन नंबर पाहू शकणार नाहीत. तसेच, ऍडमिन देखील फॉलोअर्सचा फोन नंबर पाहू शकणार नाही. चॅनलची हिस्ट्री WhatsApp मध्ये एक महिन्यासाठी स्टोअर केली जाईल.