WhatsApp ने काही काळापूर्वी माहिती दिली होती की, WhatsApp Channels फिचर लवकरच लाँच भारतात लाँच होणार आहे. आता अखेर WhatsApp अँड्रॉइडमध्ये एक नवीन इंटरफेस आला आहे. होय, Meta ने भारतासह 150 हून अधिक देशांमध्ये WhatsApp Channel फीचर लाँच केले आहे. मेटा प्रमुख मार्क झुकरबर्गने एका पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे.
https://twitter.com/WhatsApp/status/1701966105818845450?ref_src=twsrc%5Etfw
या नवीन फीचरसाठी व्हॉट्सऍप इंटरफेसमध्ये नवीन 'Updates' टॅब जोडण्यात आला आहे. हा नवीन टॅब स्टेटस टॅबने बदलण्यात आला आहे, म्हणजेच आता चॅट्स आणि कॉल्ससह स्टेटसच्या जागी ‘अपडेट्स’ टॅब देखील दिसणार आहे. या अपडेट टॅबमध्ये, स्टेटस आणि चॅनेलचा नवीन पर्याय दिसेल. स्टेटस आणि चॅनेल सेक्शनव्यतिरिक्त, तुम्हाला स्टेटस टाईप करण्यासाठी नवीन पेन आणि स्टेटसमध्ये फोटो आणि Video अपलोड करण्यासाठी कॅमेरा आयकॉन देखील दिसेल.
WhatsApp चॅनल्स टॅबमध्ये तुम्हाला अनेक चॅनेलचे नोटिफिकेशन दिसतील. हे चॅनेल कोणतेही ऑर्गनायझेशन, स्पोर्ट्स टीम, सेलिब्रिटी इ. सर्वांचे असू शकतात. हे फिचर अगदी Telegram वर उपलब्ध फिचरप्रमाणे आहे. येथे देखील तुम्ही या चॅनेलशी संबंधित अपडेट्स मिळवण्यासाठी त्यांना फॉलो करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, येथे WhatsApp चे अधिकृत चॅनेल देखील आहे, ज्यामध्ये तुम्हाला WhatsApp शी संबंधित नवीन फीचर्सची माहिती मिळेल.
विशेष म्हणजे चॅनल्स फीचर लाँच होताच बऱ्याच कलाकारांनी त्यांचे WhatsApp Channel लाँच केले आहे. अक्षय कुमार, कॅटरीना कैफ, दिलजीत दोसांझ, नेहा कक्कर, विजय देवरकोंडा यांच्यासह इतर सेलिब्रिटींनी देशात आपले Channel सुरू केले आहेत. याशिवाय, भारतीय क्रिकेट टिमने देखील आपले WhatsApp Channel सुरू केले आहे.