नवीन WhatsApp कॉल अपग्रेड: एकाच वेळी पिक्चर-इन-पिक्चर मोडसह मल्टीटास्क, लाँच डेट पहा

नवीन WhatsApp कॉल अपग्रेड: एकाच वेळी पिक्चर-इन-पिक्चर मोडसह मल्टीटास्क, लाँच डेट पहा
HIGHLIGHTS

अलीकडेच Whatsapp ने अनेक नवीन फीचर्स लाँच केले आहेत.

iOS साठी WhatsApp च्या नवीन फीचर पिक्चर-इन-पिक्चर मोडसाठी बीटा चाचणी सुरू

वापरकर्त्यांचे व्हॉट्सऍप कॉल 'एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड' असतात.

अलीकडेच WhatsApp ने अनेक नवीन फीचर्स लाँच केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'पिक्चर-इन-पिक्चर मोड'च्या iOS साठी बीटा चाचणी सुरु आहे. सर्व WhatsApp कॉल्स 'एंड-टू-एंड एनक्रिप्टेड' असतात. व्हॉट्सऍपचा वापर केवळ मेसेज पाठवण्यासाठीच केला जात नाही, तर कॉल्स आणि व्हिडीओ कॉल्ससाठीही व्हॉट्सऍपने खूप लोकप्रियता मिळवली आहे. अलीकडे व्हॉट्सऍपने अनेक नवीन फीचर्स लाँच केले आहेत, ज्याच्या मदतीने कॉल कनेक्ट करणे सोपे झाले आहे. 

हे सुद्धा वाचा : Motorola चा अप्रतिम बजेट स्मार्टफोन लाँच, किंमत 11 हजार रुपयांपेक्षा कमी

त्याचे पहिले फिचर म्हणजे '32- पर्सन कॉल', ज्यामध्ये तुम्ही एकाच वेळी 32 लोकांशी बोलू शकता, जे आधीच्या संख्येच्या 4 पट आहे. आणखी एक फिचर म्हणजे तुम्ही वापरकर्त्याचा व्हिडिओ किंवा ऑडिओ फीड त्यांच्या नंबरवर जास्त वेळ दाबून झूम इन करू शकता. हे पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही त्या वापरकर्त्याला म्यूट करू शकता किंवा कॉल चालू असताना त्याला स्वतंत्रपणे मॅसेज पाठवू शकता.

तिसरे वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला तुम्ही फक्त Zoom, GMeet किंवा Microsoft eams सारख्या वेबसाइटवर भविष्यातील मीटिंगसाठी लिंक तयार करू शकता, पण आता हे फीचर व्हॉट्सऍपमध्येही उपलब्ध झाले आहे.

नवीन Whatsapp कॉल अपग्रेड

आधी नमूद केलेल्या फीचर्सव्यतिरिक्त, यात आणखी दोन फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी पहिले म्हणजे 'कलरफुल वेव्हफॉर्म्स' ज्यामध्ये वापरकर्त्याचा कॅमेरा बंद असतानाही कॉलवर कोण बोलत आहे हे तुम्ही पाहू शकता. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'बॅनर नोटिफिकेशन' जेणेकरुन जेव्हा जेव्हा एखादा वापरकर्ता नवीन कॉलमध्ये सामील होतो तेव्हा तुम्हाला त्याचे संकेत मिळतात.

याशिवाय आणखी एक वैशिष्ट्य आहे, जे सध्या iOS साठी बीटा चाचणीमध्ये आहे आणि ते 2023 पर्यंत आणले जाऊ शकते. हे एक पिक्चर-इन-पिक्चर वैशिष्ट्य आहे ज्याच्या मदतीने वापरकर्ते एकाच वेळी एकापेक्षा जास्त कामे चांगल्या पद्धतीने करू शकतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo