व्हाट्सॅप च्या नवीन बग मुळे ब्लॉक्ड यूजर्स करू शकतील तुम्हाला मेसेज

व्हाट्सॅप च्या नवीन बग मुळे ब्लॉक्ड यूजर्स करू शकतील तुम्हाला मेसेज
HIGHLIGHTS

मेसेज पाठवण्या व्यतिरिक्त ब्लॉक्ड यूजर्स तुमचा प्रोफाइल फोटो आणि स्टेटस पण बघू शकतात.

व्हाट्सॅप पुन्हा एकदा चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे. अनेक व्हाट्सऐप यूजर्स ने तक्रार केली आहे की एका नवीन बग मुळे ब्लॉक्ड यूजर्स त्यांना मेसेज करू शकत आहेत. हा बग iOS आणि एंड्राइड दोन्ही अॅप्स मध्ये लेटेस्ट अपडेट नंतर दिसला आहे. 
WABetaInfo ने सर्वात आधी या बग बद्दल ट्विटर वर माहिती दिली होती. टिप्सटर ला व्हाट्सॅप यूजर्स चे असे अनेक मेसेजेस मिळाले ज्यात यूजर्सनी ब्लॉक्ड यूजर्स कडून येणार्‍या मेसेज ची तक्रार केली होती. मेसेज पाठवण्या व्यतिरिक्त ब्लॉक्ड यूजर्स तुमचा प्रोफाइल फोटो आणि स्टेटस पण बघू शकतात. ब्लॉकिंग फीचर च्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही कॉन्टॅक्टला आपला प्रोफाइल फोटो किंवा स्टेटस बघने किंवा मेसेज पाठवण्यावर बंधन आणू शकता. हा फीचर लोकांच्या खुप कमी येतो जसे अनोळखी यूजर्स कडून होणारा त्रास थांबवता येतो. 
या बग मुळे काही यूजर्स वर प्रभाव पडला आहे. BGR इंडिया टीम ने एकमेकांना ब्लॉक केल्यानंतर मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केला आणि ते यात यशस्वी झाले. कंपनी कडून या बाबतीत कोणतीही माहिती समोर आली नाही पण सोशल मीडिया वर व्हाट्सॅप यूजर्सनी या बग ची तक्रार केली आहे. 
आता या समस्ये पासून वाचण्यासाठी यूजर्स ब्लॉक्ड यूजर्सना अनब्लॉक करून पुन्हा ब्लॉक करू शकतात. जर तुम्हाला या बग चा त्रास झाला तर तुम्ही हा उपाय करू शकता. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo