Whatsapp वर वॉयस मेसेज पाठवणाऱ्या यूजर्स साठी खुशखबरी, या नव्या फीचर ने होईल मोठा फायदा
Whatsapp एंड्राइड बीटा अॅप मध्ये लॉक वॉयस मेसेज रेकॉर्डिंगचा फीचर आला आहे, हा त्या लोकांसाठी उपयोगी ठरेल जे जास्त वॉयस मेसेज पाठविणे पसंत करतात.
Whatsapp च्या एंड्राइड बीटा वर एक नवीन फीचर आला आहे, त्यामुळे Whatsapp वापरणाऱ्या त्या यूजर्स चा सर्वात जास्त फायदा होणार आहे, जे मोठ्या प्रमाणात किंवा जास्त वॉयस मेसेज पाठविणे पसंत करतात.
एंड्राइड बीटा अॅप मध्ये आता लॉक वॉयस मेसेज रेकॉर्डिंग सपोर्ट आला आहे. या फीचर ने फायदा हा होणार आहे की आता तुम्हाला वॉयस मेसेज पाठविण्यासाठी सतत Mic बटन होल्ड करावा लागणार नाही. जरी हा सपोर्ट एंड्राइड यूजर्स साठी आता फक्त बीटा वर उपलब्ध आहे पण याला iOS यूजर्स साठी आधीच उपलब्ध करण्यात आले आहे.
चला जाणून घेऊया कसा काम करतो हा फीचर
या फीचर ने हे सुनिश्चित होते कि कोणत्याही यूजरला कोणताही वॉयस मेसेज रेकॉर्ड करताना Mic बटन होल्ड करावे लागू नये. जर तुम्ही मेसेज रेकॉर्डिंग लॉक करू इच्छित असाल तर तुम्हाला कोणताही मेसेज रेकॉर्ड करताना माइक बटन वर स्वाइप करावे लागेल, यानंतर लॉक सिंबल तुम्हाला दिसेल. जेव्हा तुम्हाला हा ऑप्शन दिसायला लागले तेव्हा तुम्ही समजून जा की तुमचा मेसेज लॉक झाला आहे.
या नंतर हा मेसेज तुम्हाला सेंड मेसेज बार मध्ये दिसू लागेल आणि जर तुम्ही याला पठावू इच्छित नसाल तर तुम्ही याला कॅन्सल पण करू शकता. याचा अर्थ असा की जर तुम्ही एखादा मेसेज रेकॉर्ड केला आहे आणि तुम्हाला तो पाठविणे योग्य वाटत नसेल तर तुम्ही तो तुमच्या कडे ठेऊ शकता आणि पाठविण्याच्या आधी कॅन्सल पण करू शकता. पण जर तुम्हाला हा मेसेज पाठवायचा असेल तर हा तुमच्या सेंड बार मध्ये आहे, तुम्हाला फक्त सेंड बटन वर क्लिक करायचे आहे आणि तुमचा मेसेज सेंड होईल.
आता पर्यंत तुम्ही हे करू शकत नव्हतात. तुम्हाला एखादा मेसेज रेकॉर्ड करण्यासाठी माइक बटन वर होल्ड करावे लागत होते आणि त्यानंतर स्लाइड करून तुम्ही हा मेसेज सेंड करत होता. हा नवीन फीचर आल्यानंतर तुमचे काम अजूनही सोप्पे होणार आहे. एंड्राइड मध्ये हा फीचर अजूनपर्यंत उपलब्ध झाला नाही पण आमच्या iOS डिवाइस मध्ये हा फीचर दिसत आहे. त्यामुळे जर तुम्ही हा फीचर आता एंड्राइड वर पाहू शकत नसाल तर तुम्ही हा iOS वर बघू शकता.