सध्या सर्व कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर केला जात आहे. अशा परिस्थितीत मेटा-मालकीचे इन्स्टंट मल्टीमीडिया मेसेजिंग App WhatsApp मागे राहील, हे तर शक्यसाज नाही. व्हॉट्सऍप आता आपल्या App मध्ये AI चॅटबॉटला सपोर्ट करणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, नव्या फीचरची टेस्टिंग बीटा आवृत्तीवर केली जात आहे. बीटा यूजर्सने त्याचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे.
पुढे आलेल्या अहवालानुसार, WhatsApp चे हे नवीन अपडेट सध्या अमेरिकेतील बीटा यूजर्ससाठी उपलब्ध आहे. नवीन अपडेट Android बीटा आवृत्ती 2.23.24.26 वर पाहता येईल. बीटा वापरकर्त्यांना एक व्हाईट बटण दिसत आहे, ज्यावर बहुरंगी रिंग आहे.
या वर्षाच्या सुरुवातीलाच मेटाने सांगितले होते की, ते WhatsApp, इंस्टाग्राम आणि मेसेंजरमध्ये AI सपोर्ट देणार आहे. हे AI मेटाच असेल, मेटाच्या मोठ्या भाषेच्या मॉडेलचे नाव ‘लामा 2’ आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे रिअल टाइममध्ये वापरकर्त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकते. यात वेब सर्चसाठी मायक्रोसॉफ्ट बिंजचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
WhatsApp च्या या AI च्या मदतीने वापरकर्ते टेक्स्ट प्रॉम्प्टवरून इमेजेस देखील तयार करू शकतील. त्याबरोबरच, AI अवतारचाही सपोर्ट असणार आहे. नवीन फीचरची चाचणी WhatsApp च्या आणखी एका अँड्रॉइड बीटा 2.23.25.3 आवृत्तीवर केली जात आहे. त्यानंतर व्हॉट्सऍपवर ‘व्ह्यू ऑल’ स्टेटस फीचरही येईल. या सूचीमध्ये चॅनेल अकाउंट्सचे स्टेटस देखील व्हिजिबल असतील. हे फिचर इन्स्टाग्राम स्टोरीजसारखेच असणार आहे.