आजकाल सोशल मीडिया वर आपण दिवसातून अर्ध्या पेक्षा जास्त वेळ घालवतो. Facebook, Youtube, Instagram, इ. वर आपण नेहमीच ऍक्टिव्ह असतो. यामध्ये लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ऍप WhatsAppचा देखील समावेश आहे. फरक फक्त इतका की, वरील सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जाहिराती सारख्या येत असतात. या सतत येणाऱ्या जाहिरातींमुळे खरं तर युजर हैराण होतो. पण WhatsApp युजर्ससाठी अशी काही समस्या अद्याप तरी नाही. पण आता वृत्तानुसार, WhatsAppवर देखील जाहिराती दिसू शकतात. वाचा सविस्तर-
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, 2014 मध्ये मार्क झुकरबर्गने $19 बिलियनमध्ये विकत घेतल्यापासून जगभरात 2 अब्जाहून अधिक वापरकर्ते असलेले WhatsApp जाहिरातमुक्त आहे. दरम्यान, हे नवीन ऍड्स फीचर कंपनीसाठी कमाईचे स्रोत म्हणून काम करेल, असे मानले जात आहे.
वृत्तानुसार, आता तुम्हाला स्टेटसवर जाहिराती दिसणार आहे. WhatsApp चे प्रमुख विल कॅथकार्ट यांनी ब्राझिलियन मीडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या मेसेजिंग सेवेवर जाहिराती समाविष्ट करण्याच्या प्लॅनबद्दल कबूली दिली तेव्हा ही माहिती समोर आली. या मुलाखतीवरून सर्व अफवा खऱ्या असू शकतात, हे स्पष्ट होते.
पुढे, कंपनी वापरकर्त्यांच्या प्राथमिक चॅट इनबॉक्समध्ये जाहिराती दाखवणार नाही, असेही अहवालात समोर आले आहे. कॅथकार्टने स्पष्ट केले की, जाहिराती फक्त चॅनल आणि WhatsApp च्या स्टेटस फीचरवर दाखवल्या जातील.
कॅथकार्टने यांनी सांगितले की, चॅनेल किंवा स्टेटस सारख्या ठिकाणी जाहिराती देखील असू शकतात. म्हणजेच सोप्या भाषेत, चॅनेल मेंबरशिपसाठी शुल्क आकारू शकतात. मात्र, ते फक्त अशा ग्राहकांसाठी उपलब्ध असतील, जे ऍक्सेससाठी पैसे देतील.
याशिवाय, एका मेटा अधिकाऱ्याने याची पुष्टी केली आहे की, ते सध्या कोणत्याही देशांमध्ये स्टेटस जाहिरातींची टेस्टिंग करत नाहीत. इंस्टाग्राम व्यतिरिक्त आता WhatsApp देखील जाहिराती सादर करणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, पूर्वी 2012 मध्ये फेसबुकने इन्स्टाग्रामचे अधिग्रहण केल्यानंतर, त्याने जाहिराती दाखवण्यास सुरुवात केली.