WhatsApp ने गेल्या काही दिवसांत युजर्ससाठी एकापेक्षा एक फीचर आणले आहेत. आता HD कॉलिटीमध्ये इमेज पाठवण्यासोबत ग्रुपमध्ये व्हॉईस चॅटही करता येणार आहे. चला जाणून घेऊया WhatsAppच्या टॉप 5 मस्त फीचर्सबद्दल, जर तुम्ही WhatsApp चे हे लेटेस्ट फीचर्स अजूनही ट्राय केले नसतील तर पुढील माहिती तुमच्यासाठी आहे.
मेटा CEO मार्क झुकरबर्ग यांनी या महिन्याच्या सुरुवातीला हे फिचर सादर केले होते. या नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही तुमची स्क्रीन समोरच्या व्यक्तीसोबत सहज शेअर करू शकता. जर तुम्हाला मीटिंग दरम्यान एखाद्या समोर फोनमधील एखादी माहिती सादर करायची असेल, तर हे फीचर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. आतापर्यंत जे काम Google Meet, Zoom, Discord किंवा Skype वर केले जात होते, ते तुम्ही थेट WhatsApp वर देखील करू शकता.
कुठेही मजकूर पाठवण्याचा प्रश्न येतो तेव्हा लाखो लोकांकडे WhatsApp हा एक सहज मार्ग असतो. आतापर्यंत, ऍपवर एक समस्या होती. ती म्हणजे त्यावर पाठवलेल्या फोटोची कॉलिटी जरा कमी होत होती. उत्तम कॉलिटीच्या फोटो पाठवण्यासाठी थर्ड पार्टी ऍपचा आधार घ्यावा लागत होता. मात्र, आता ही सुविधा WhatsApp वरच देण्यात आली आहे. लवकरच, युजर्स ऍपवर HD कॉलिटी व्हीडिओ देखील पाठवू शकतील.
जिथे WhatsApp ग्रुप कॉल फीचर सर्वांना एकाच वेळी कॉल करू देते. नवीन फीचर तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तीला सायलेंट नोटिफिकेशन पाठवते. ग्रुप कॉल्सच्या विपरीत, हे नवीन फिचर तुम्हाला मॅन्युअली सदस्य जोडण्याचे स्वातंत्र्य देते. याशिवाय, या नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही जेव्हा हवं तेव्हा कॉलमध्ये सामील होऊ शकता आणि जेव्हा हवं तेव्हा कॉल सोडू देखील शकता.
तुम्ही WhatsApp वर कधीही चुकीच्या कॅप्शनसह कोणतीही मीडिया फाईल पाठवली असेल किंवा तुम्हाला आठवत असेल की त्यात टायपिंग मिस्टेक आहे. आता अशा फाइल्सचे कॅप्शन तुम्ही एडिट करू शकता. म्हणजेच फाईल्स पुन्हा पुन्हा पाठवण्याच्या समस्येतून तुमची सुटका होणार. हे फंक्शन मेसेज एडिट फीचरप्रमाणेच काम करते. म्हणजेच, जर तुम्ही एखाद्याला चुकीचा मॅसेज पाठवला, तर तुम्ही तो संपादित करू शकता. मात्र, लक्षात घ्या की, आपल्याकडे संपादित करण्यासाठी फक्त 15 मिनिटांचा अवधी असेल.
मेटा CEO मार्क झुकरबर्गने वापरकर्त्यांसाठी जीवन सुलभ करण्यासाठी नुकतेच एक नवीन फिचर सादर केले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही आता कोणत्याही नावाशिवाय ग्रुप तयार करू शकता. या ग्रुपमध्ये केवळ 6 लोक ऍड होऊ शकतात. ग्रुपमध्ये उपस्थित असलेल्या लोकांच्या आधारे 6 लोकांच्या ग्रुपला आपोआप नाव देण्यात येणार आहे.