आपल्या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी, WhatsApp गेल्या अनेक महिन्यांपासून चॅनल अपडेट्स, व्यू वन्स आणि प्रोफाइल इन्फो यांसारख्या फिचरवर काम करत आहे. सतत येणाऱ्या अपडेट्स आणि फीचर्समध्ये आता App या संदर्भात देखील मेसेजिंग ऍप आता दोन नवीन शॉर्टकट फीचर्स सादर करण्याच्या तयारीत आहे. या शॉर्टकट्सच्या मदतीने, वापरकर्ते त्यांचे वैयक्तिक चॅट सहजपणे लॉक करू शकतील.
WhatsApp फीचर्सचा मागोवा घेणाऱ्या wabetainfo या साइटच्या अहवालातून नव्या अपडेट्सबद्दल माहिती मिळाली आहे. अँड्रॉइड 2.23.22.4 अपडेट रिलीज झाला आहे, ज्या अंतर्गत काही बीटा वापरकर्त्यांसाठी नवीन शॉर्टकटचा सपोर्ट उपलब्ध झाला आहे, असे अहवालात सांगण्यात आले आहे. वाचा सविस्तर-
पहिला शॉर्टकट WhatsApp च्या चॅट लिस्टमध्ये मिळेल, जिथून कोणतीही चॅट सहजपणे लॉक करता येईल. यासाठी तुम्हाला चॅटवर लॉंग प्रेस करावे लागेल. त्यानंतर, उजव्या कोपऱ्यात थ्री-डॉट येतील, त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला ‘लॉक चॅट’ पर्याय दिसले, त्यावर टॅप करा. अशाप्रकारे सहज तुमचे चॅट लॉक केले जाईल. दुसरीकडे, दुसऱ्या शॉर्टकटबद्दल बोलायचे झाल्यास, ते टॉगल बटणच्या रूपात उपस्थित असेल, जे चॅट इन्फ स्क्रीनमध्ये येईल. या टॉगलच्या मदतीने तुम्ही चॅट लॉक देखील करू शकता.
लॉकिंग प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि प्रायव्हसी मजबूत करण्यासाठी हे शॉर्टकट खास तयार केले जात आहेत, असे सांगितले जात आहे. हे शॉर्टकट वापरकर्त्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत. हे नवे फिचर डिसेंबरच्या शेवटी किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला रोलआऊट केले जाईल.
वर सांगितल्याप्रमाणे, WhatsApp सध्या प्रोफाइल इन्फोवर देखील काम करत आहे. हे फिचर ऍक्टिव्ह केल्याने, वापरकर्त्यांना संपर्काच्या चॅट विंडोमध्ये लास्ट सीनऐवजी प्रोफाइल इन्फो दिसणार आहे. हे फिचर लास्ट सीनला रिप्लेस करेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे फीचर बीटा युजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. त्याबरोबरच, प्रोफाईल इन्फो फीचर येत्या काही दिवसांमध्ये सर्व वापरकर्त्यांसाठी आणले जाण्याची अपेक्षा आहे.