Instagram वरील सारख्या येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे वैतागलात? ‘अशा’प्रकारे ऑन करा Quite Mode फिचर
अधिक चांगला अनुभव देण्यासाठी Instagram सतत आपल्या प्लॅटफॉर्मवर नवीन फीचर्स जोडतो.
निरुपयोगी सूचना टाळण्यासाठी इंस्टाग्रामने 'Quite Mode' फीचर सादर केले.
Instagram Quite Mode 'अशा;प्रकारे ऑन करा, पहा सोपी प्रक्रिया
आपण सर्वांना माहितीच आहे की, दीर्घकाळापासून तरुणाईमध्ये Instagram ट्रेंडमध्ये असतो. Instagram बद्दल तरुणाईमधील क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दररोज लाखो लोक वापरतात आणि प्लॅटफॉर्मवर अनेक अनुयायी आणि मित्र एकत्र करणे सोपे आहे. एवढेच नाही तर, तुम्ही चांगले कंटेंट क्रिएटर असाल तर याद्वारे पैसे देखील कमवू शकता. वापरकर्त्यांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी Instagram सतत आपल्या प्लॅटफॉर्मवर नवीन फीचर्स जोडत असते.
Also Read: मनोरंजन झाले स्वस्त! मुकेश अंबानींनी लाँच केले JioStar! प्लॅन्सची किंमत केवळ 59 रुपयांपासून सुरू
मात्र, तुम्ही देखील Instagram वर येणाऱ्या मॅसेजेस आणि नोटिफिकेशन्समुळे वैतागला असाल तर, अजिबात काळजी करून नका. कारण, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Quite Mode फिचरबद्दल माहिती देणार आहोत. ज्याद्वारे सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्सचा तुम्हाला त्रास होणार नाही. Quite Mode वापरकर्त्यांचे ऍक्टिव्हिटी स्टेटस अपडेट करतो आणि त्यांचे नोटिफिकेशन्स बंद करतो. जाणून घ्या Quiet Mode फीचर कसे वापरता येईल-
Instagram Quite Mode फिचर
तुम्हाला सुद्धा Instagram वर अनावश्यक नोटिफिकेशन्स आणि मेसेज त्रास देत असतील तर, आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. अशा निरुपयोगी सूचना टाळण्यासाठी इंस्टाग्रामने ‘Quite Mode’ फीचर सादर केले आहे. जेव्हा हे फिचर ऑन असेल, तेव्हा तुमचे ऍक्टिव्हिटी स्टेटस अपडेट केले जाईल. यासह तुमच्या नोटिफिकेशन्सना विराम दिला जाईल.
जेव्हा एखादा वापरकर्ता तुम्हाला मॅसेज पाठवतो, तेव्हा त्यांना एक ऑटोरिप्लाय पाठवला जाईल. ज्यामध्ये तुम्हाला त्यांच्या DM बद्दल सूचित केले गेले नाही, असे सांगितले जाईल. रात्री किंवा इतर कोणतेही काम करताना हा मोड ऑन करता येतो. विशेष म्हणजे फीचर ऑन होण्याच्या 10 मिनिटे आधी यूजरला रिमाइंडर मिळतो.
Instagram Quite Mode ‘अशा’प्रकारे ऑन करा.
- तुमच्या फोनवर Instagram ओपन करा, तुमच्या प्रोफाइलवर जाण्यासाठी तुमच्या प्रोफाइल इमेजवर टॅप करा.
- आता वरील कोपऱ्यातील तीन डॉट्सवर टॅप करा. आता तुम्हाला मेनूमधून Notifications वर टॅप करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला Quite Mode वर टॅप करावे लागेल. आता या मोडच्या पुढील टॉगलद्वारे हे फीचर सक्षम आणि अक्षम केले जाऊ शकते.
- यानंतर, आता तुम्हाला Quite Mode साठी प्रारंभ आणि समाप्ती वेळ सेट करावी लागेल. तुमच्या गरजेनुसार तुम्ही ही सेटिंग वापरता येईल.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, Quite Mode आठवड्याच्या प्रत्येक दिवसासाठी सक्षम आहे. आपल्या सोयीनुसार ते अक्षम आणि व्यवस्थापित केले जाऊ शकते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile