मीडिया प्लेयर सॉफ्टवेअर आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हर VLC मीडिया प्लेयरवर बंदी घालण्यात आली आहे. अहवालानुसार, व्हिडिओलॅन प्रोजेक्टच्या VLC मीडिया प्लेयर आणि वेबसाइटवर आयटी कायदा, 2000 अंतर्गत सरकारने बंदी घातली आहे.
हे सुद्धा वाचा : Moto X30 Pro : 200MP कॅमेरा असलेला जगातील पहिला फोन, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स
VLC मीडिया प्लेयर आणि त्याच्या वेबसाइटची सेवा सुमारे दोन महिने आधीच बंद करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणी कंपनी आणि सरकारकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. VLC मीडियाची वेबसाईट ओपन केल्यावर आय ऍक्ट अंतर्गत बॅन केल्याचा मेसेज दिसतो.
काही अहवालांनुसार, व्हीएलसी मीडिया प्लेयरवर देशात बंदी घालण्यात आली आहे, कारण त्याचा वापर चीन-समर्थित हॅकिंग ग्रुप सिकाडाद्वारे सायबर हल्ल्यांसाठी केला गेला होता. काही महिन्यांपूर्वी, सायबर तज्ञांनी सांगितले होते की, सिकाडा दीर्घकाळ सायबर हल्ल्यासाठी VLC मीडिया प्लेयर वापरत आहे. या हॅकिंग ग्रुपने या मीडिया प्लेयरमध्ये मालवेअर इन्स्टॉल केले होते.
याआधीही सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात जवळपास 350 चायनीज ऍप्सवर बंदी घातली होती. अलीकडे, बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया BGMI देखील Google Play Store आणि Apple च्या ऍपवरून अचानक गायब झाले. BGMI बंदीची नंतर एका वृत्तसंस्थेने पुष्टी केली. 2020 मध्ये PUBG वर बंदी घातल्यानंतर BGMI हा PUBG चा नवीन अवतार म्हणून लाँच करण्यात आला होता.