Prisma सह संस्थापक Alexei Moiseenkova ने अशी घोषणा केली आहे की, लवकरच Prisma अॅपमध्ये व्हिडियो एडिटींगचा नवीन फीचर जो़डणार आहे.
पोकेमोन गो मोबाईल गेमसह आणखी एका गोष्टीने इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय आणि हा आहे प्रसिद्ध फोटो एडिटींग अॅप Prisma. हा अॅप आतापर्यंत iOS वरच उपलब्ध होता आणि आता हा लवकरच अॅनड्रॉईडवर सुद्धा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर आणखी एक बातमी समोर येत आहे की, पुढील काही आठवड्यातच Prisma अॅपमध्ये व्हिडियो एडिटींग फीचरचासुद्धा समावेश केला जाणार आहे. ही घोषणा स्वत:कंपनीचे को-फाउंडर Alexei Moiseenkova ने केली आहे.
त्यांनी असेही सांगितले आहे की,” काही आठवड्यातच प्रिजमा व्हिडियो एडिटींग फीचर लाँच केले जाईल, ज्याने यूजर्स आपल्या व्हिडियोला उत्कृष्टरित्या एडिट करु शकतील. त्याचबरोबर त्याचे अनेक आर्टिस्टिक फील्टरसुद्धा दिले गेले आहेत, जे तुमच्या व्हिडियोला चार चांद लावतील.”