WhatsApp आपल्या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी ॲपमध्ये दररोज नवनवीन फीचर्स जोडत आहे. होय, ऍपमध्ये युजर्सच्या सोयीसाठी नवे डायलर पॅड समाविष्ट करणार असल्याची माहिती मिळत आहे. या फीचरची टेस्टिंग अखेर सुरू झाली आहे. नव्या फिचरच्या आगमनानंतर, वापरकर्ते व्हॉट्सॲप नंबर डायल करून कोणत्याही संपर्कास कॉल करण्यास सक्षम असतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात आगामी WhatsApp Dailer फीचरबद्दल सविस्तर माहिती-
Also Read: WhatsApp: आता चॅट बॅकअपसाठी कोणतीही अडचण येणार नाही, फक्त QR कोड स्कॅन करून होईल काम
WhatsApp च्या आगामी Dailer फिचरच्या आगमनाने ऍपमधून कॉल करणे अधिक सोपे झाले आहे. व्हॉट्सॲपच्या आगामी फीचर्सवर आणि ऍक्टिव्हिटीजवर नजर ठेवणाऱ्या वेबसाइट Wabetainfo च्या अहवालातून हे आगामी फीचरबद्दल माहिती मिळाली आहे.
वरील स्क्रिनशॉटनुसार, WhatsApp च्या कॉल टॅबमध्ये एक फ्लोटिंग ॲक्शन बटण दिसत आहे, ज्यावर क्लिक करून डायलर पॅड उघडता येतो. येथून युआजर कोणत्याही सामान्य कॉलप्रमाणे नंबर डायल करून कॉल करू शकतो. यासह तुम्हाला कोणतेही नंबर सेवा करण्याची गरज नाही, ज्यामुळे कॉलिंग प्रक्रिया अधिक सुलभ होईल. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, डायलर फिचर बीटा वापरकर्त्यांसाठी रोल आउट करण्यात आले आहे. टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर नव्या फिचरचे समर्थन आगामी अपडेट्ससह मिळण्यास सुरुवात होईल.
WhatsApp मध्ये डायलर आल्याने यूजर्स केवळ कॉलच नाही तर नवीन कॉन्टॅक्ट सेव्ह देखील करू शकतील. यामुळे तुम्हाला WhatsApp वर कोणता कॉन्टॅक्ट आहे आणि कोणता नाही हे सहज लक्षात येईल. याशिवाय, डायलर स्क्रीनमध्ये मॅसेज शॉर्टकट देखील उपलब्ध असेल, ज्याद्वारे यूजर्स कोणत्याही कॉन्टॅक्टला सहज मॅसेज करू शकतील.
आगामी फिचर बीटा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. लवकरच हे फिचर स्थिर Android आणि iPhone वापरकर्त्यांसाठी जारी केले जाईल अशी अपेक्षा आहे. सध्या हे फीचर लॉन्च करण्याबाबत मेसेजिंग ॲप WhatsApp कडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.