WhatsApp युजर्सची प्रायव्हसी जपण्यासाठी एकावर एक उत्तम फीचर्स घेऊन येत आहे. काही दिवसांपूर्वीच, कंपनीने व्ह्यू वन्स मेसेजसाठी, स्क्रीनशॉट ब्लॉक करण्यासाठी आणि लीव्ह ग्रुप सायलेंटलीसह ऑनलाइन स्टेटस लपवण्यासाठी फीचर्स जाहीर केली आहेत. आता व्हॉट्सऍप वापरकर्त्यांसाठी आणखी एक अतिशय उपयुक्त फीचर घेऊन आले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही 'डिलीट फॉर एव्हरीवन'च्या जागी 'डिलीट फॉर मी' केलेलं मॅसेज रिकव्हर करू शकता. हे करण्यासाठी वापरकर्त्यांना केवळ काही सेकंद मिळतील.
हे सुद्धा वाचा : भारीच की ! Vivo Y35 4G स्नॅपड्रॅगन चिपसह लाँच, जाणून घ्या डिटेल्स
व्हॉट्सऍप अपडेट्सचा मागोवा घेणाऱ्या WABetaInfo या वेबसाइटने ट्विट करून या नव्या फीचरची माहिती दिली. WABetaInfo नुसार, या फीचरचे नाव Undo delete message असे आहे. सुरुवातीला हे फीचर बीटा यूजर्ससाठी आणले जात आहे. जर तुम्ही बीटा वापरकर्ता असाल, तर तुम्ही व्हॉट्सऍप अँड्रॉइड वर्जन 2.22.18.13 मध्ये हे फीचर वापरून पाहू शकता. कंपनी काही निवडक बीटा वापरकर्त्यांसाठी हे फिचर आणत आहे.
व्हॉट्सऍप या महिन्याच्या अखेरीस वापरकर्त्यांसाठी 'लीव्ह ग्रुप सायलेंटली' फीचर आणू शकतो. हे फीचर सादर केल्यानंतर यूजर्स कोणताही ग्रुप शांतपणे सोडू शकतील आणि कुणालाही त्याबद्दल माहिती असणार नाही. ग्रुप सोडताना फक्त ग्रुप ऍडमिनलाच माहिती होईल. याशिवाय व्हॉट्सऍपमध्ये ऑनलाइन स्टेटस हाईड करण्याचे फीचरही येत आहे.
हे फिचर ऍक्टिव्ह केल्यानंतर, तुम्ही तुमचे ऑनलाइन स्टेटस लपवूनही चॅटिंग करू शकाल. व्हॉट्सऍप सेटिंग्जच्या अकाउंट सेक्शनच्या प्रायव्हसी सेक्शनमध्ये जाऊन ऑनलाइन स्टेटस आणि लास्ट सीन हा पर्याय मिळेल. कंपनी ऑगस्टच्या अखेरीस जागतिक वापरकर्त्यांसाठी व्ह्यू वन्स मॅसेज आणि स्क्रीनशॉट ब्लॉक करण्यासाठी एक फिचर देखील आणण्याची शक्यता आहे.