UberReserve द्वारे कॅब 90 दिवस अगोदर आरक्षित केल्या जाऊ शकतात.
हे फिचर खास एअरपोर्टवर जाणाऱ्या ग्राहकांसाठी उपयुक्त ठरेल.
Uber कॅब बुक ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उबर ऍपद्वारे वापरकर्ते लवकरच 90 दिवस अगोदर कॅब आरक्षित करू शकतील. विशेषत: एअरपोर्ट साठी कॅब बुक करणाऱ्यांसाठी हे नवीन फिचर असणार आहे.
साहजिकच विमानतळ किंवा इतर कोणत्याही स्थानकावर कॅबची मागणी अधिक असते. त्यामुळे, ऐनवेळी अनेक वेळा वापरकर्त्यांना Uber प्रीमियम किंवा Uber XL बुक करावे लागते. मात्र, नवीन Uber फीचरमुळे युजर्सना कॅब बुक करणे सोपे होणार आहे. एका ब्लॉग पोस्टमध्ये, Uber ने म्हटले आहे की वापरकर्त्यांना कुठेही जाण्यास मदत करण्याचा कंपनीचा हेतू आहे. तुमचा विमानतळाचा अनुभव नेहमीपेक्षा चांगला आणि सुलभ बनवण्यासाठी नवीन 'UberReserve फिचर' येथे आहे.
UberReserve द्वारे कॅब 90 दिवस अगोदर आरक्षित केल्या जाऊ शकतात. याचा अर्थ असा की ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या फ्लाइट किंवा ट्रेनची तिकिटे प्री-बुक करता, उबेर कॅब देखील त्याच प्रकारे आरक्षित करता येते. विमानतळावर पोहोचण्यापूर्वी तुम्ही कॅब बुक करू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय कॅब बुक करू शकता.
कॅब आरक्षित केल्यावर, वापरकर्ते भाडे आणि ड्रायव्हरचे तपशील पाहू शकतील. सध्या हे फीचर अमेरिका आणि कॅनडातील युजर्ससाठी सुरू करण्यात आले आहे. येत्या काळात हे फीचर इतर ग्राहकांसाठीही लाईव्ह केले जाणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.