Twitter ची नवी तयारी ! आता व्हीडिओ कॉलिंग सुविधा देखील मिळणार ?
एलॉन मस्क ट्विटरमध्ये नवा आणि मोठा बदल करणार
वापरकर्ते लवकरच कॉल आणि एन्क्रिप्टेड मेसेजिंग करू शकणार आहेत.
एन्क्रिप्टेड मेसेजिंग एक सुरक्षित मेसेजिंग पद्धत आहे.
Twitter लोकप्रिय आणि बहुचर्चित मायक्रोब्लॉगिंग साईट आहे. मालक एलॉन मस्क ट्विटरमध्ये नवा आणि मोठा बदल करणार आहेत, अशा चर्चा सध्या सुरु आहेत. या बदलासह ट्विटर वापरकर्ते लवकरच कॉल आणि एन्क्रिप्टेड मेसेजिंग करू शकणार आहेत. एन्क्रिप्टेड मेसेजिंग एक सुरक्षित मेसेजिंग पद्धत आहे. यासह, कंपनी आणि कोणतेही हॅकर ते डिकोड करू शकत नाही.
मस्कने Twitter 2.0 The Everything App चे अनावरण केले, तेव्हा एनक्रिप्टेड डायरेक्ट मेसेज फीचर सुविधेचा उल्लेख करण्यात आला होता. मस्कने पुढे सांगितले की, बुधवार म्हणजेच आजपासून ट्विटरवर एन्क्रिप्टेड डायरेक्ट मेसेज फीचर सुरू होईल. परंतु अद्याप एनक्रिप्टेड कॉल्सबद्दल काहीही माहिती देण्यात आलेली नाही.
ट्विट करून दिली माहिती
With latest version of app, you can DM reply to any message in the thread (not just most recent) and use any emoji reaction.
Release of encrypted DMs V1.0 should happen tomorrow. This will grow in sophistication rapidly. The acid test is that I could not see your DMs even if…
— Elon Musk (@elonmusk) May 9, 2023
आपल्या नव्या ट्विटमध्ये मस्क यांनी लिहले की, ''लवकरच व्हॉईस आणि व्हिडिओ चॅटची सुविधा उपलब्ध होणार आहे. प्लॅटफॉर्मवर असताना वापरकर्ते कुणाशीही आणि कुठल्याही ठिकाणी लोकांशी संवाद साधू शकतात. यामध्ये यूजर्सना त्यांचा नंबर शेअर करण्याची देखील गरज नाही. "
Twitter सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो. या आठवड्यात Twitter गेल्या अनेक वर्षांपासून निष्क्रिय किंवा संग्रहित केलेले अकाउंट्स रिमूव्ह करण्याची प्रक्रिया सुरू करेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile