ट्विटरचा हा नवीन फीचर आपोआपच व्हाइट टेक्स्टसह डार्क ब्लू बॅकग्राउंडमध्ये ऑन होईल.
मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटर लवकरच एक नवीन फीचरसह लाँच होणार आहे. एका रिपोर्टनुसार, अॅनड्रॉईड फोन्ससाठी ट्विटरच्या ह्या नवीन व्हर्जनवर काम चालू आहे, ज्यात एक नवीन नाइट मोडचा समावेश केला आहे. तथापि नाइट मोड फीचर ही काही मोठी गोष्ट नाही, मात्र ह्याचे खास वैशिष्ट्य हे आहे की, हे आपोआप ऑन होईल. सध्यातरी ट्विटर आपल्या अल्फा/बिटा व्हर्जनवर ह्या फीचरला घेऊन काम करत आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, रात्री नाइट मोड आपोआप ऑन होईल आणि सकाळी पुन्हा नॉर्मल वाइट डे मध्ये जाईल. अल्फा व्हर्जनविषयी बोलायचे झाले तर, ह्यात नाइट मोडला ऑन आणि ऑफ करण्याचा पर्याय नाही आहेे. मात्र अंतिम व्हर्जनपर्यंत ह्याला फिक्स केले गेले आहे.
ट्विटरच्या ह्या नवीन व्हर्जनने ठिकाण आणि वेळेनुसार व्हाइट बॅकग्राउंडसह ब्लॅक टेक्स्ट UI च्या जागेवर निळ्या रंगात व्हाइट टेक्स्ट असलेली UI येईल. महत्त्वाचे म्हणजे ह्यातील डार्क अँड नाइट UI ची कल्पना काही नवीन नाही आहे. इतर अॅप्स नाइट UI फीचर आधीपासूनच देत आहेत.