Twitter New Feature: ऍपवर लवकरच उपलब्ध होणार WhatsApp बटन, एका क्लिकवर ट्विट शेअर होईल

Twitter New Feature: ऍपवर लवकरच उपलब्ध होणार WhatsApp बटन, एका क्लिकवर ट्विट शेअर होईल
HIGHLIGHTS

लवकरच Twitter वर येणार नवीन फिचर

आता ट्विट थेट व्हॉट्सऍपवर शेअर करता येईल

WhatsApp चे देशात 400 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते

मायक्रो-ब्लॉगिंग आणि सोशल नेटवर्किंग साइट  Twitter वर तुम्हाला लवकरच WhatsApp बटण मिळेल. होय, ट्विटर आपल्या नवीन फिचरची भारतात चाचणी करत आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना ट्विटर ट्वीट थेट व्हॉट्सऍपवर शेअर करता येईल. वापरकर्ते ट्विट त्यांच्या व्हॉट्सऍप ग्रुप्स आणि कॉन्टॅक्ट्ससोबत एकाच टॅपमध्ये शेअर करू शकतील. भारतात Share to WhatsApp बटण आणणारा Twitter हा पहिला सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म नाही, तर त्याआधी ShareChat ने WhatsApp ची लोकप्रियता पाहता WhatsApp बटण फीचर जारी केले.

हे सुद्धा वाचा : 5000mAh बॅटरीसह Realme चा स्वस्त फोन लवकरच होणार लाँच, 1 सेकंदापेक्षा कमी वेळात होईल अनलॉक 

स्वतः Twitter इंडियाने नव्या फीचरची माहिती दिली आहे. ट्विटरने सांगितले की, आम्ही आमच्या नवीन फीचरची चाचणी करत आहोत, ज्यामध्ये एका टॅपने ट्विट थेट व्हॉट्सऍपवर शेअर केले जाऊ शकतात. ट्विटमधील व्हॉट्सऍप बटन देखील नियमित शेअर बटनने रिप्लेस होण्याची शक्यता आहे. सध्या, नियमित शेअर बटन ट्विट लिंक कॉपी करणे, बुकमार्क करणे, थेट मॅसेजद्वारे पाठवणे आणि इतर सोशल मीडियावर शेअर करणे असे पर्याय देते. 

भारतात व्हॉट्सऍपची लोकप्रियता पाहता ट्विटरचे हे पाऊल आश्चर्यकारक नाही. WhatsApp चे देशात 400 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. हे देशातील मित्र आणि कुटुंबियांसोबत कंटेंट शेअर करण्यासाठी सर्वाधिक वापरले जाणारे ऍप आहे. म्हणूनच ट्विटर अधिक वापरकर्त्यांना त्याच्या प्लॅटफॉर्मवर निर्देशित करण्यासाठी मेटा-मालकीच्या मेसेजिंग ऍपची लोकप्रियता वापरण्याचा प्रयत्न करत आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo