Twitter वरील व्हेरिफाईड अकाऊंटसाठी म्हणजेच ब्लूटिक अकाउंटसाठी वापरकर्त्यांना दर महिन्याला सबस्क्रिप्शन शुल्क भरावे लागेल. यापूर्वी हे $20 प्रति महिना दराने केले जाणार होते, परंतु वापरकर्त्यांनी याला विरोध केला आणि ते खूप महाग म्हटले आहे. यानंतर कंपनीचे नवीन मालक Elon Musk यांनी मासिक शुल्क $8 म्हणजेच सुमारे 660 रुपये एवढे करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मस्क यांनी ट्विटही केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ब्लू टिक्ससाठी ट्विटरची सध्याची सिस्टम बकवास आहे.
हे सुद्धा वाचा : बंपर डील! 11,000 रुपयांच्या सवलतीसह Google चा जबरदस्त 5G फोन खरेदी करा…
https://twitter.com/elonmusk/status/1587498907336118274?ref_src=twsrc%5Etfw
ट्विटर ब्लू टिकसाठी मासिक सबस्क्रिप्शन शुल्क कमी करण्याव्यतिरिक्त मस्कने वापरकर्त्यांसाठी काही नवीन आणि विशेष फीचर्स देखील आणली आहेत. मस्क म्हणाले की, "आता स्पॅम आणि घोटाळा रोखण्यासाठी वापरकर्त्यांना आवश्यक प्रायोरिटीमध्ये रिप्लाय, मेन्शन आणि सर्च ऑप्शन मिळेल. याशिवाय आता यूजर्स ट्विटरवर मोठे व्हिडिओ आणि ऑडिओ पोस्ट करू शकतील. तसेच, ट्विटर वापरकर्त्यांना आता पूर्वीपेक्षा खूपच कमी जाहिराती दिसणार आहेत."
https://twitter.com/elonmusk/status/1587499283573530625?ref_src=twsrc%5Etfw
इलॉन मस्क Twitter Verify खात्यासाठी निश्चित केलेल्या सदस्यता शुल्काबाबत आता कोणतेही बदल करणार नाही. मस्क यांनी आज सकाळी आणखी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी सबस्क्रिप्शन चार्जसाठी तक्रार करणाऱ्यांना तक्रार करत राहण्यास सांगितले आहे, पण आता ते फक्त $8 प्रति महिना राहील.