Twitter चे नवे मालक एलॉन मस्कने जाहीर केले आहे की, वापरकर्त्यांना आता Blue Tick व्हेरिफिकेशनसाठी दरमहा पैसे द्यावे लागतील आणि ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घ्यावे लागेल. यूएसमध्ये, त्याची किंमत $ 8 आहे आणि भारतात देखील त्याचे रोलआउट सुरू झाले आहे. मात्र, समस्या अशी आहे की वापरकर्त्यांना भारतात ट्विटर ब्लू टिकसाठी दरमहा $8 पेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
हे सुद्धा वाचा : तब्बल चार वर्षानंतर CID सिरीयल येणार का प्रेक्षकांच्या भेटीला ? 'या' पोस्टने वेधले चाहत्यांचे लक्ष…
काही वापरकर्त्यांनी भारतात ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनशी संबंधित प्रॉम्प्ट पाहिले आहे. अहवालांनुसार, ट्विटर ब्लूशी संबंधित प्रॉम्प्ट iOS ऍप स्टोअरवर भारतीय वापरकर्त्यांना दाखवण्यात आले आहे. या वापरकर्त्यांना ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनची किंमत 719 रुपये प्रति महिना दाखवण्यात आली आहे. म्हणजेच, भारतीय वापरकर्त्यांना व्हेरिफिकेशन टिकसाठी दरमहा 719 रुपये द्यावे लागतील, असे दिसून येत आहे. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांची व्हेरिफिकेशन टिक काढून घेतली जाईल.
https://twitter.com/SPDPranesh10/status/1590953441001865216?ref_src=twsrc%5Etfw
एलॉन मस्क यांनी स्पष्ट केले आहे की, जर तुम्हाला ट्विटर ब्लूचे सबस्क्रिप्शन हवे असेल तर तुम्हाला दरमहा $8 खर्च करावे लागतील.मात्र, भारतात यासाठी निश्चित केलेली किंमत $8 पेक्षा जास्त आहे. भारतात ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनची किंमत 719 रुपये ठेवण्यात आली आहे, जी आज $8.91 च्या जवळपास आहे. म्हणजेच भारतीय वापरकर्त्यांना ब्लू टिकसाठी सुमारे 73 रुपये जास्त द्यावे लागतील.
अनेक वापरकर्त्यांनी भारतात ट्विटर ब्लूसाठी निश्चित केलेल्या किंमतीबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र, नवीन प्रॉम्प्ट सर्व वापरकर्त्यांसाठी दृश्यमान नाही आणि Twitter Blue चे भारतात विस्तृत रोलआउट अद्याप बाकी आहे. युजर्सच्या तक्रारीनंतर कंपनी ही किंमत बदलू शकते आणि ट्विटर ब्लू टिक घेणे 719 रुपयांपेक्षा स्वस्त होऊ शकतो. सध्या ट्विटर इंडियाने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.