मे महिन्याच्या अखेरीस सर्व वापरकर्त्यांसाठी ही सेवा सुरु होणार
TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना ऑफलाइन बनावट कॉल आणि SMS ब्लॉक करण्यास सांगितले .
स्पॅम कॉल्स आणि मॅसेजेसवर कारवाई करण्यासाठी WhatsApp आणि Truecaller ने हातमिळवणी केली आहे. त्यामुळे लवकरच Truecaller ची कॉलर आयडेंटिफिकेशन सर्विस इन्स्टंट मेसेजिंग ॲप WhatsApp साठी सुरू होणार आहे. या सेवेच्या माध्यमातून इंटरनेटवरून केले जाणारे फेक कॉल्स आणि मेसेज शोधले जाऊ शकतात.
याबाबत Truecaller च्या CEO ने घोषणा केली आहे. सध्या ही सेवा बीटा फेजमध्ये आहे. काही वापरकर्त्यांसह त्याची चाचणी देखील केली जात आहे. यशस्वी टेस्टिंग नंतर Truecaller ते सर्व व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी आणणार आहे.
या महिन्याच्या शेवटी येणार फीचर
मिळालेल्या माहितीनुसार, Truecaller च्या CEO ने सांगितले की, मे महिन्याच्या अखेरीस सर्व वापरकर्त्यांसाठी ही सेवा जागतिक स्तरावर सुरू केली जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की 2021 च्या एका अहवालानुसार, भारतातील प्रत्येक वापरकर्त्याला एका महिन्यात WhatsApp वर किमान 17 स्पॅम कॉल प्राप्त होतात.
TRAI चा मोठा निर्णय
टेलिकॉम रेग्युलेटर TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना ऑफलाइन बनावट कॉल आणि SMS ब्लॉक करण्यास सांगितले आहे. यासाठी दूरसंचार कंपन्या Airtel आणि Jio ने AI आधारित सेवा आणण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांचे 70% वापरकर्ते आहेत. येत्या काही महिन्यांत सर्व दूरसंचार कंपन्या ऑफलाइन फेक कॉल्स आणि मेसेजला पूर्णविराम देतील, असे देखील सांगण्यात आले आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.