Spams कॉल्सने तुम्ही देखील वैतागलात ना? Truecaller ने नवीन जारी केले अप्रतिम AI फीचर, मिळेल उत्तम प्रोटेक्शन्स
Truecaller ने नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI फिचर सादर केले आहे.
नव्या फीचरचे नाव AI-पावर्ड मॅक्स स्पॅम ब्लॉकिंग फीचर आहे.
या फिचरसाठी वापरकर्त्यांना Truecaller च्या प्रीमियम प्लॅन्सचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
Truecaller ने नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI फिचर सादर केले आहे, जे सर्व स्पॅम कॉल्स आपोआप ब्लॉक करेल आणि स्पॅमर्सपासून अप्रतिम प्रोटेक्शन प्रदान करेल. हे फिचर सध्या फक्त Android ॲपवर उपलब्ध आहे. होय, ऍपवर स्पॅम कॉलसाठी नवीन ‘मॅक्स’ प्रोटेक्शन जोडले गेले आहे. मात्र, हे फीचर सर्व युजर्सकरता उपलब्ध होणार नाही. हे प्रीमियम फीचर म्हणून आणले जात आहे आणि ॲपचे पैसे देणाऱ्या वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध असेल. जाणून घेऊयात Truecaller ने जारी केले अप्रतिम AI फीचर-
हे सुद्धा वाचा: Infinix Note 40 Pro 5G सिरीजचे इंडिया लाँच Confirm! अखेर Flipkart वर मायक्रोसाइट Live। Tech News
Truecaller चे नवीन AI फीचर
Truecaller ॲपवर पैसे भरणारे ग्राहक नवीन फीचर शोधण्यासाठी सेटिंग्ज > ब्लॉकमध्ये जाऊ शकतात. पूर्वी या सेटिंगमध्ये वापरकर्त्यांना निवडण्यासाठी दोन टॅब ‘ऑफ आणि बेसिक’ दिले जात होते. ऑफ वर सेट केल्यावर, स्पॅम कॉलर ओळखले जातात, परंतु अवरोधित केले जात नाहीत. तर, बेसिक मोडमध्ये ॲप ऑटोमॅटिक स्पॅमर म्हणून मोठ्या प्रमाणावर तक्रार केलेल्या नंबरवरून कॉल अवरोधित करते. आता मॅक्स लेबलचा एक नवीन टॅब आहे.
AI-पावर्ड मॅक्स स्पॅम ब्लॉकिंग फीचर
मॅक्स निवडल्याने सर्व स्पॅमर्सचे कॉल आपोआप ब्लॉक केले जातील. हे सेटिंग नोटिफिकेशन्ससह येते, की ते काही कायदेशीर बिझनेस कॉल अवरोधित करू शकते. Truecaller सर्चचे अध्यक्ष कुणाल दुआ म्हणाले की, कंपनीने स्पॅम नंबर ओळखण्यासाठी अनेक मार्केटमध्ये डझनभर अल्गोरिदमची टेस्टिंग केली आणि फीचर लागू करण्यासाठी AI सिस्टमचा वापर केला. कंपनीने असेही म्हटले आहे की, त्यांनी फीचर सुधारण्यासाठी वापरकर्त्यांकडून फीडबॅक देखील घेतला आहे.
AI-पॉवर मॅक्स स्पॅम ब्लॉकिंग फिचर फक्त Truecaller च्या Android ॲपवर उपलब्ध आहे. पण, या फिचरसाठी वापरकर्त्यांना Truecaller च्या प्रीमियम प्लॅन्सचे सदस्यत्व घ्यावे लागेल. भारतात सदस्यता 75 रुपये मासिक आणि 529 रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile