झपाट्याने बदलत चालेल्या ह्या फास्ट लाइफमध्ये मोबाईल्सचा वापरही तितकाच झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे आपलेल्या असंख्य अनोळखी कॉल्स, कंपनीचा, लॉटरीचा एवढच काय तर एखाद्या स्कीमचा कॉल्स अशा अनेक निनावी कॉल्सने अगदी भंडावून सोडलय. मात्र ह्यात असे काही निनावी कॉल्सही असतात, ज्यात कधी स्वत:च्या विरंगुळ्यासाठी दुस-याला सतावणे, अर्वाच्य भाषा वापरणे हा एकच उद्देश असतो. त्यामुळे ह्या सर्वांवर उपाय म्हणून आणि सुरक्षा म्हणून टेक जगतात आले ट्रू कॉलर अॅप. पण अजूनही कित्येकांना ह्याचा योग्य उपयोग कसा करावा हेच माहित नाहीये. पण काळजी करु नका, आज आम्ही सांगणार आहोत, ट्रू कॉलर अॅपविषयी अशा काही गोष्टी ज्या कदाचित तुमच्या फायद्याच्या असू शकतील.
आपल्याला विशिष्ट नंबरवरुन येणारे कॉल घ्यायचे नसल्यास ते कॉल ब्लॉक करण्याची सोय 'ट्रूकॉलर अॅप'मध्ये उपलब्ध आहे.
आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह केलेले नंबर 'ट्रूकॉलर अॅप'च्या डेटाबेसमध्ये अॅड झाल्यानंतर संबंधित नंबरवरुन कॉल आला तर इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसली तरी कॉलरची माहिती मोबाइलधारकाला दिसू शकते.
नंबर टाइप करुन एखाद्या व्यक्तीचे नाव शोधण्याची सोय 'ट्रूकॉलर अॅप'मध्ये आहे.
ट्रूकॉलरचेच 'ट्रूडायलर अॅप' आहे. या अॅपमुळे एखाद्या अनोळखी व्यक्तीचा नंबर आणि नाव शोधणे शक्य होते.
'ट्रूकॉलर अॅप' वापरणा-या एक किंवा जास्त व्यक्तींनी एखादा नंबर स्पॅम गटात टाकला तर त्याच नंबरवरुन जगात कोणालाही कॉल आला तर मोबाइलधारकाला स्पॅम कॉलर फोन करत असल्याचे लक्षात येते. ही माहिती मिळाल्यावर मोबाइलधारक कॉल स्वीकारायचा की नाही, याचा निर्णय घेऊ शकतो.
ट्रूकॉलरवर अॅप युझर स्वतःचे प्रोफाइल तयार करू शकतात, कस्टमाइज्ड करू शकतात. या प्रोफाइलमध्ये आपले पूर्ण नाव, व्हिडिओ, इ-मेल, वेबसाइट टाकण्याची सोय आहे. फेसबुक आणि ट्रूकॉलरचे अकाउंट एकमेकांशी सिंक करणे शक्य आहे. तसेच प्रायव्हसी सेटिंग एडिट करुन स्वतःची ओळख लपवू शकता.
ट्रूकॉलरच्या डेटामधून स्वतःचा नंबर काढून टाकण्याची सोय उपलब्ध आहे. नंबर काढून टाकण्यासाठी http://www.truecaller.com/unlist वर जाऊन आपला मोबाइल नंबर टाइप करा, नंबर काढून टाकण्याचे कारण सांगा आणि कॅप्चा कोड टाइप करुन अनलिस्ट बटणावर टाइप करा. अनलिस्टवर क्लिक करताच ट्रूकॉलरच्या डेटामधून संबंधित नंबर काढून टाकला जाईल.
हेदेखील वाचा – वेबसाइटवरील जास्त ट्रॅफिकमुळे फ्रीडम २५१ बुकिंग काही काळासाठी बंद
हेदेखील वाचा – मिजू M2 नोट विरुद्ध लेनोवो K3 नोट