700 करोड युजर्स पूर्ण केल्यानंतर, लोकप्रिय मेसेजिंग ऍप टेलिग्रामने आपली प्रीमियम सर्व्हिस लाँच केली आहे. Telegram Premium वापरणाऱ्या युजर्सना अनेक नवीन फीचर्सचा ऍक्सेस दिला जाईल. फीचर्स अंतर्गत 4 GB पर्यंत फाइल अपलोड, फास्ट डाऊनलोड स्पीड, एक्सक्लुझिव्ह स्टिकर्स आणि अशा अनेक सुविधा उपलब्ध असतील. रिपोर्टनुसार, कंपनी यासाठी प्रत्येक महिन्याला $4.99 चार्ज करेल. भारतीय वापरकर्त्यांसाठी याची किंमत काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
टेलिग्रामवर सर्व वापरकर्त्यांसाठी 2 GB पर्यंत फाइल्स पाठवण्याची सुविधा आधीच उपलब्ध आहे. परंतु टेलीग्राम प्रीमियम सदस्यांची फाइल साईझ लिमिट 4GB असेल. मात्र, या फाईल्स डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला प्रीमियम मेंबरशिपची आवश्यकता नाही.
हे सुद्धा वाचा : OnePlus Nord 2T भारतात 'या' किंमतीत लाँच केला जाईल, जाणून घ्या संभावित फीचर्स
टेलीग्राम प्रीमियम सदस्यांना टेलीग्राम सर्व्हरवर सर्वात फास्ट डाउनलोड स्पीडचा ऍक्सेस मिळेल. "आपण आपल्या अमर्यादित क्लाउड स्टोरेजमध्ये शक्य तितक्या स्पीड नेटवर्कद्वारे सर्वकाही ऍक्सेस करू शकता," अशी माहिती कंपनीच्या ब्लॉग पोस्टमध्ये दिलेली आहे.
प्रीमियम वापरकर्त्यांसाठी, स्टॅंडर्ड अकाउंटवर ठेवलेल्या जवळपास सर्व मर्यादा वाढवल्या जातील. उदाहरणार्थ, टेलिग्राम प्रीमियम ग्राहक 1,000 चॅनेल फॉलो करू शकतात. प्रत्येकी 200 चॅट्ससह 20 चॅट फोल्डर तयार करू शकतात, मुख्य यादीमध्ये 10 चॅट पिन करू शकतात.
टेलीग्राम प्रीमियम वापरकर्ते व्हॉइस नोट्स ऐकण्याऐवजी वाचण्यास प्राधान्य देत असल्यास ते व्हॉइस नोट्स टेक्स्टमध्ये रूपांतरित करू शकतील.