आता मनसोक्त गाणी ऐका ! Spotify प्रीमियम 6 महिने मोफत वापरा, ‘या’ दिवशी संपणार जबरदस्त ऑफर

आता मनसोक्त गाणी ऐका ! Spotify प्रीमियम 6 महिने मोफत वापरा, ‘या’ दिवशी संपणार जबरदस्त ऑफर
HIGHLIGHTS

Spotify प्रीमियम सदस्यता भारतात 6 महिन्यांसाठी मोफत उपलब्ध

Amazon Indiaने आणली भन्नाट ऑफर

Spotify प्रीमियम ऑफर 24 ऑक्टोबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत खरेदीदारांसाठी उपलब्ध

तुम्हाला गाणी ऐकण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Spotify प्रीमियम सदस्यता भारतात 6 महिन्यांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. खरं तर , Amazon India ने आपल्या ग्राहकांसाठी ही खास ऑफर आणली आहे, ज्या अंतर्गत ते आपल्या प्लॅटफॉर्मवर निवडक खरेदीदारांना सहा महिन्यांपर्यंत Spotify प्रीमियम सदस्यता मोफत देत आहे. तुम्हाला 6 महिन्यांसाठी Spotify Premium चे सबस्क्रिप्शन मोफत मिळवायचे असेल तर ही खास ऑफर जाणून घ्या…

हे सुद्धा वाचा : वेडात मराठे वीर दौडले सात : अक्षय कुमारचे मराठीत पदार्पण, महेश मांजरेकरांच्या चित्रपटात ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणार

 Amazon India च्या या ऑफर अंतर्गत खरेदीदारांनी ई-रिटेल प्लॅटफॉर्मवर टॅब्लेट, लॅपटॉप, मोबाईल डिव्हाइसेस, स्पीकर, हेडफोन आणि ऍक्सेसरीज यांसारखी विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी केल्यास त्यांना Amazon वर मोफत Spotify प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळेल. पण ऑफरमध्ये एक अट देखील आहे. म्हणजेच, Amazon ने आपल्या सपोर्ट पेजवर लिहिले आहे की, ही ऑफर फक्त अशा ग्राहकांना दिली जाईल ज्यांनी Amazon India मध्ये ईमेल ID नोंदणीकृत आहे आणि ज्यांनी यापूर्वी Spotify Premium च्या मोफत ट्रायलचे सदस्यत्व घेतलेले नाही.

Spotify प्रीमियम ऑफरची वैधता

 Amazon India ने त्याच्या सपोर्ट पेजवर लिहिले आहे की, त्याची Spotify प्रीमियम ऑफर 24 ऑक्टोबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत खरेदीदारांसाठी उपलब्ध असेल. कंपनीने असेही म्हटले आहे की, पात्र ग्राहकांना याचा लाभ मिळेल. म्हणजे तीन किंवा सहा महिन्यांसाठी Spotify प्रीमियमच्या वैयक्तिक प्लॅनचा मोफत प्रवेश जो त्यांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर 15 डिसेंबर 2022 पर्यंत व्हाउचरच्या स्वरूपात पाठवला जाईल.

Amazon India ची Spotify प्रीमियम ऑफर

 Amazon India ने म्हटले आहे की ज्या ग्राहकांच्या लॅपटॉप, टॅब्लेट, मोबाईल डिव्हाइसेस आणि ऍक्सेसरीज, हेडफोन्स आणि स्पीकरची खरेदी किंमत 1,000 रुपयांपेक्षा जास्त आहे आणि 5,000 रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना तीन महिने मोफत मिळेल. म्हणजेच Spotify प्रीमियम सदस्यता उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे, ज्या ग्राहकांचे लॅपटॉप, टॅब्लेट, मोबाइल उपकरणे आणि ऍक्सेसरीज, हेडफोन आणि स्पीकरची खरेदी किंमत 5,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना स्पॉटीफाय प्रीमियमचे सहा महिन्यांचे सबस्क्रिप्शन मोफत मिळेल.

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo