Snapchat मध्ये आला आहे Group Video Chat फीचर

Snapchat मध्ये आला आहे Group Video Chat फीचर
HIGHLIGHTS

तुम्हाला तर माहितीच आहे की फेसबुक मेसेंजर, गूगल Hangouts आणि Skype मध्ये आधी पासूनच ग्रुप विडियो चॅट ऑप्शन आहे आणि आता याला Snapchat मध्ये पण आणण्यात आले आहे तसेच आता यूजर्स एका यूजर पोस्ट मध्ये इतर लोकांना टॅग पण करू शकतील.

तुम्हाला तर माहितीच आहे की फेसबुक मेसेंजर, गूगल Hangouts आणि Skype मध्ये आधी पासूनच ग्रुप विडियो चॅट ऑप्शन आहे आणि आता याला Snapchat मध्ये पण आणण्यात आले आहे तसेच आता यूजर्स एका यूजर पोस्ट मध्ये इतर लोकांना टॅग पण करू शकतील. 

नवीन फीचर्स यूजर्सना व्यस्त ठेवण्यास मदत करू शकतात आणि अॅप मध्ये जास्त वेळ घालवण्यासाठी तुम्हाला प्रेरित करू शकतात. मागच्या काही काळात स्नॅप चा ग्रोथ रेट जोरात वाढला आहे. मागच्या क्वार्टर च्या तुलनेत आता नार्थ अमेरिकेत यांच्या डेली एक्टिव यूजर्स च्या संख्येत 17.7 टक्के वाढ झाली आहे. तसेच यांच्या प्रतिस्पर्ध्या बद्दल बोलायचे झाले तर फेसबुक या लिस्ट मध्ये फक्त 2.2 टक्क्यांवरच थांबला आहे. तसेच काही रिपोर्ट्स असे पण म्हणतात की लोक जास्त वेळ आता इन्स्टाग्राम च्या जागी स्नॅपचॅट वर घालवतात. 
या नव्या फीचर मध्ये जवळपास 16 लोक एक साथ एकाच वेळी एकाच कॉल वर जोडले जाऊ शकतात. हा आकडा विडियो कॉल चा आहे, तसेच वॉयस कॉल बद्दल बोलायचे झाले तर यात एका वेळी जवळपास 32 लोक एक साथ जोडले जाऊ शकतात. तसेच कॉल्स दरम्यान फेस फिल्टर्स पण वापरता येतील. पण यूजर्स च्या फ्रेंड्सलाच फक्त कॉल करताना आपल्या सोबत जोडता येईल. आता पर्यंत स्नॅपचॅट च्या माध्यमातून फक्त दोन लोकांमध्ये हा विडियो कॉल केला जाऊ शकत होता. पण हा फीचर प्रत्यक्षात येण्यासाठी थोडा वेळ लागेल. 
तसेच या फीचर सोबतच स्नॅपचॅट ने add mentions ची पण घोषणा केली आहे. या फीचर च्या माध्यमातून तुम्ही @ च्या मदतीने कोणत्याही यूजरला पण अॅड करू शकता. त्यामुळे त्या यूजर्सना ज्यांना तुम्ही आपल्या पोस्ट मध्ये सामील केले आहे, त्यांना नोटिफिकेशन मिळेल. 

स्नॅपचॅट च्या डेली यूजर्स बद्दल बोलायचे झाले तर याचे सरासरी डेली यूजर्स ची संख्या 187 मिलियन आहे. तसेच एक यूजर या अॅप मध्ये एका दिवसात जवळपास 25 वेळा येतो. हे आकडे कंपनीने समोर आणले आहेत.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo