मायक्रोसॉफ्टचे व्हिडियो कॉलिंग प्लेटफॉर्म स्काइप युजर्ससाठी नवीन आकर्षक व्हिडियो आणि हलत्या भावनादर्शक चित्रांची सुविधा देणार आहे. ज्यात उपयोगकर्ता बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या छोट्या छोट्या क्लिप्सचा वापर चॅटिंग दरम्यान करु शकतात. स्काइपच्या ह्या नवीन संवादी व्हिडियोज अथवा टॉकिंग पिक्चरचे नाव ‘मोजिस’ आहे.
स्काइपने ह्या सुविधेसाठी यशराज फिल्म्स तथा इरॉस इंटरनॅशनलचे ऑन डिमांड एंटरटेनमेंट प्लेटफॉर्म इरॉस नाऊसोबत करार केला आहे. स्काइपनुसार ही नवीन सुविधा चॅट प्लेटफॉर्ममध्ये क्रांतिकारी परिवर्तन आणेल. तसेच कंपनीने बाजाराच्या रुपात भारताचे महत्त्व या विषयावर जास्त भर दिला असल्याचे कंपनीने सांगितलय.
ह्या क्लिप्सचा आकार मोठा असेल. हे अॅपमध्येच असतील, ज्याच्यामुळे वापरकर्त्यांना त्याला डाउनलोड करावे लागणार नाही आणि डाउनलोड न करता ते ह्या क्लिप्सना दुस-यांना पाठवू शकता. सध्यातरी जवळपास १०० मोजिस उपलब्ध आहे आणि लवकरच ही संख्या अजून वाढवली जाईल.
ह्याविषयी सविस्तर माहिती देताना स्काइपचे कॉर्पोरेट उपाध्यक्ष गुरदीप पालने सांगितले की, “स्काइपवर सर्वोत्कृष्ट मेसेजिंग अनुभव देणे हाच आमचा उद्देश आहे आणि त्यासाठी भारतातील उत्कृष्ट फिल्म इंडस्ट्रीचा वापर करणे हाच उत्तम मार्ग आहे."