असा मेसेज पाठवून तुम्ही तुमच्या मित्रांची मस्करी करू शकता.
आजकाल WhatsApp आपण सर्वच वापरतो. जवळपास सर्व जगातील लोक WhatsApp चा वापर करतात. पण मी तुम्हाला आज एका अशा ट्रिक बद्दल सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांची WhatsApp वर मस्करी करू शकाल.
तसे तर तुम्ही तुमच्या मित्रांना हसवणारे अनेक मेसेज पाठवत असाल, पण एक अशी पद्धत आहे ज्याने तुम्ही तुमच्या मित्रांना ब्लँक मेसेज पाठवू शकता आणि त्यांच्या सोबत थोडी मस्करी पण करू शकता. ते विचार करत बसतील की तुम्ही काय मेसेज पाठवला आहे कारण त्यांना तर काहीच दिसणार नाही. ते थोडा वेळ वाट बघतील आणि तुम्हाला मेसेज करून विचारतील की नेमका काय मेसेज पाठवला होता, जो त्यांना वाचता नाही आला.
अस करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या फोन मध्ये गूगल प्ले स्टोर मध्ये जाऊन "Empty" अॅप डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर तुम्ही जेव्हा या अॅप ला ओपन कराला तेव्हा तुमच्या स्क्रीन वर एक पेज दिसेल. यात सर्वात वर एक लाइन दिसेल, ज्यातून तुम्ही निवडू शकता की हा ब्लँक मेसेज किती मोठा किंवा छोटा असेल.
त्यानंतर तुम्हाला खाली असलेल्या "WhatsApp" आइकॉन वर टॅप करावं लागेल, नंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल जिथे तुमचे सर्व कॉन्टेक्ट्स दिसतील, आता तुम्हाला ज्यांना हा मेसेज पठावायचा आहे त्यांना निवडा आणि सेंड वर क्लिक करा.