सॅमसंगने चीनमध्ये अधिकृतरित्या सॅमसंग पे (मोबाईल वॉलेट सेवा) लाँच केली आहे.
सॅमसंगने चीनमध्ये अधिकृतरित्या सॅमसंग पे (मोबाईल वॉलेट सेवा) लाँच केली आहे. कंपनीने ही सेवा क्षेत्रीय यूनियन पे सह भागीदारी केल्यानंतर सुरु केली. ह्या सेवेच्या माध्यमातून आपण आपल्या स्मार्टफोनवरुनच कोणत्याही सामानासाठी पैसे मोजू शकता.
ही सेवा अॅप्पल पे सेवेकडे पाहता लाँच करण्यात आली आहे. अॅप्पल पे चीनमध्ये ह्याआधीच लाँच झाली आहे. त्याचबरोबर अॅप्पल पे ने सुद्धा ह्या क्षेत्रीय कंपनीसह भागीदारी केली होती. अॅप्पल आणि सॅमसंग पे सेवा आता चीनमध्ये सुरु असलेल्या अली पे सेवेला कडक टक्कर देणार आहेत.
लोकप्रिय असलेल्या सोशल मिडिया प्लेटफॉर्म WeChat चे सुद्धा पेमेंट सिस्टम आहे. त्याशिवाय चीन स्मार्टफोन निर्माता कंपनी हुआवेनेसुद्धा यूनियन पेसह भागीदारी करुन हुआवे पे, एक NFC मोबाईल पेमेंट सेवा सुरु केली आहे.