Reliance JioTV App ने एयरटेल टीवी आणि वोडाफोन प्ले ला दिली मात

Updated on 10-Dec-2018
HIGHLIGHTS

रिलायंस जियोटीवी ऍप ने एयरटेल टीवी आणि वोडाफोन प्ले मागे टाकत एक नवीन रेकॉर्ड केले आहे, असे बोलले जात आहे की जियो ने आपल्या ऍप च्या माध्यमातून जवळपास 621 लाइव टीवी चॅनेल्स स्ट्रीम केले जात आहेत.

रिलायंस जियो भारतात आल्यांनतर पासूनच आपल्या यूजर्सना अनेक ऍप पण ऑफर करते, या ऍप मध्ये जियो म्यूजिक, जियो मनी, जियो टीवी इत्यादींचा समावेश आहे. पण या सर्व ऍप मध्ये सर्वात जास्त प्रसिद्द कोणतं असेल तर ते जियोटीवी हे आहे. विशेष म्हणजे याच्या माध्यमातुन जियो आपल्या यूजर्सना ऑन डिमांड कंटेंट देते. आणि आता कंपनी ने या अंतर्गत मिळणारी सेवा अजूनच वाढवली आहे. टेलीकॉमटॉक च्या एका रिपोर्टनुसार, आता रिलायंस जियो ने आपल्या जियोटीवी ऍप मध्ये जवळपास 621 चॅनेल्स ऑफर केले जात आहेत, जो एका वेगळाच आणि मोठा रेकॉर्ड आहे. आता पर्यंत डेटा च्या बाबतीत रिलायंस जियो सर्वात पुढे जात होती, आता या बाबतीत पण आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून जियो ने एक नवीन रेकॉर्ड केला आहे. 

या सेवे अंतर्गत दिले जाणारे हे चॅनेल्स एखाद्या DTH सेवेमध्ये मिळणाऱ्या चॅनेल्स पेक्षा पण जास्त आहेत. यामुळे म्हणजे इतके जास्त लाइव टीवी चॅनेल्स ऑफर केल्यामुळे कंपनी ने एयरटेल टीवी आणि वोडाफोन प्ले ला चांगली मात दिली आहे. या दोन्ही कंपन्यांकडे इतके चॅनेल्स नाहीत, जितके रिलायंस जियो ने तुम्हाला देत आहे. 

यातील एयरटेल टीवी मध्ये तुम्हाला जवळपास 375+ चॅनेल्स मिळत आहेत, तरीही या दोघांमधील फरक अर्ध्यपेक्षा जास्त आहे. या ऍप मध्ये तुम्हाला जवळपास 10,000+ मूवी आणि पॉप्युलर टीवी शो मिळतात, तसेच एयरटेल ने Eros Now, SonyLiv, HOOQ, Hotstar, Amazon, Altbalaji इत्यादींसोबत पण भागेदारी केली आहे. त्याचबरोबर हा ऍप जवळपास 50 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी गूगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड केला आहे. 

रिलायंस जियो बद्दल बोलायचे झाले तर जियोटीवी ऍप जवळपास 100मिलियन पेक्षा जास्त डाउनलोड मिळाले आहेत. यात तुम्हाला 621 चॅनेल्स ऑफर केले जात आहेत, जे न्यूज आणि मनोरंजनच्या चॅनेल्स इत्यादी मध्ये विभागले जाऊ शकतात. विशेष म्हणजे ऍप मध्ये तुम्हाला जवळपास 193 बातम्यांचे आणि जवळपास 122 चॅनेल्स मनोरंजनासाठी रिलायंस जियो ऑफर करत आहे. त्याचबरोबर यात तुम्हाला जवळपास 50 धार्मिक चॅनेल्स मिळतात, 49 शिक्षणासंबंधित चॅनेल्स यात आहेत, तसेच यात 35 च्या आसपास इंफोटेनमेंट, 27 च्या आसपास किड्स चॅनेल्स आहेत. तसेच अनेक भारतीय भाषांमध्ये तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता, इतकेच नव्हे तर तुम्हाला जवळपास 46 च्या आसपास इंग्रजी HD चॅनेल्स आणि जवळपास 32 Hindi HD चॅनेल्स मिळत आहेत.
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :