रिलायंस जियोफोन आता MobiKwik वर झाला उपलब्ध
By
Siddhesh Jadhav |
Updated on 12-Feb-2018
HIGHLIGHTS
रिलायंस जियोफोन ला आता मोबिक्विक वरून पण बूक केले जाऊ शकते. याआधी या 4G फीचर फोन ला फक्त रिलायंस जियो च्या वेबसाइट आणि माई जियो अॅप मधून विकत घेता येऊ शकत होते.
रिलायंस जियो ने घोषणा केली आहे कि कंपनी चा 4G फीचर फोन आता मोबिक्विक च्या माध्यमातून पण विकत घेतला जाऊ शकतो. पीटीआई च्या एका रिपोर्ट नुसार, मोबिक्विक हा कंपनीच्या आपल्या वेबसाइट नंतर पहिला प्लॅटफॉर्म ठरला आहे, जिथून हा फोन विकत घेतला जाऊ शकतो. इथे विशेष लक्षात घेतलं पाहिजे की बुकिंग नंतर, हा फोन ग्राहकांना डिलीवर नाही केला जात, याला घेण्यासाठी स्टोर वर जावे लागेल.
मोबिक्विक वर जियोफोन ला बुक करण्यासाठी, अॅप च्या होमपेज वर रिचार्ज ऑप्शन वर क्लिक करा. हा डिवाइस 'फोन बुकिंग' ऑप्शन च्या अंतर्गत सूचीबद्ध केला गेला आहे. नंतर आवश्यक माहिती दिल्या नंतर, तुम्ही नोंदवलेल्या मोबाइल नंबर सह खरेदी बद्दलची माहिती समोर येईल मग तुम्ही पेमेंट करू शकाल.
पेमेंट झाल्यानंतर जियो एक कंफर्मेशन मेसेज पाठवेल आणि मग तुम्हाला स्टोर डिटेल्स च्या बाबतीत अजून एक मेसेज मिळेल, जिथून तुम्ही तुमचा जियोफोन घेऊ शकाल. हे लक्षात असू दे की आईडेंटिटी वेरिफिकेशन नंतरच हा फोन तुम्हाला दिला जाईल.
रिलायंस जियो ने मागच्या वर्षी जुलै मध्ये जियोफोन ची घोषणा केली आणि कंपनी ने सध्या आपल्या दूसरे फेरीच्या प्री-बुकिंग ची सुरवात केली आहे. स्मार्ट 4G फीचर फोन ची किंमत 1500 रुपये आहे आणि हा तसा फ्री फोन आहे कारण 3 वर्षांनंतर डिवाइस परत केल्यानंतर तुम्हाला पैसे रिफंड केले जातील.
हा डिवाइस KiaOS, वर चालतो जो फायरफॉक्स ओएस चा एक फोर्क्ड वर्जन आहे आणि सध्या तरी हा फोन जियोटीवी, जियो मॅजिक आणि दुसर्या अॅप्सना सपोर्ट करतो. कंपनी ह्या फोनला लोकप्रिय अॅप्स फेसबुक आणि वॉट्सॅप सपोर्टिव बनवण्यासाठी पण काम करत आहे.