तुम्हीही इन्स्टाग्रामवर रील्स बनवत असाल किंवा इन्स्टाग्राम यूजर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. इंस्टाग्राम आता नवीन आणि उत्तम अपडेटवर काम करत आहे. इंस्टाग्रामच्या या नवीन अपडेटमुळे युजर्स 90 सेकंदांचे रील रेकॉर्ड करू शकतील. सध्या 60 सेकंदच रील्स बनवण्याची सुविधा आहे. आता तुम्ही रिल्समध्येच व्हिडिओ शेअर करू शकता, म्हणजेच इन्स्टाग्रामच्या कॅमेऱ्याऐवजी तुम्हाला फोनच्या कॅमेऱ्यातून रेकॉर्ड केलेला व्हिडिओ क्लिपमध्ये ऍड करता येईल. तुम्ही आता तुमचा स्वतःचा ऑडिओ देखील इंस्टाग्रामवर ऍड करू शकता.
भारतात टिकटॉकवर बंदी आल्यानंतर इंस्टाग्रामने रिल्स फीचर लाँच केले, जे टिकटॉकसारखेच आहे. इन्स्टाग्राम रील्सवर लवकरच मॉनिटाईझेशन सुविधा उपलब्ध होणार आहे. इंस्टाग्रामने एका ब्लॉगपोस्टद्वारे नवीन अपडेटबाबत माहिती दिली आहे.
हे सुद्धा वाचा : ब्लूटूथ कॉलिंग आणि हार्ट रेट सेन्सरसह Noiseची उत्कृष्ट स्मार्टवॉच लाँच, लाँच ऑफरमध्ये 50% सूट
या आठवड्याच्या सुरुवातीला, Instagram ने एक नवीन अलर्ट फीचर जारी केले आहे. या अलर्ट फीचरच्या मदतीने लोक त्यांच्या भागातील हरवलेल्या मुलांची माहिती देऊ शकतील. यासाठी इन्स्टाग्रामने अनेक संस्थांसोबत भागीदारी केली आहे.
काही दिवसांपूर्वी, Instagramने स्टोरीज आणि डायरेक्ट मॅसेजसाठी 3D अवतार देखील लाँच केला आहे. कंपनीने Facebook ऍप आणि मॅसेंजरसाठी देखील 3D अवताराची नवीन आवृत्ती सादर केली आहे. नवीन अवतारमध्ये नवीन फेशियल शेप मिळतील, ज्याच्या मदतीने युजर्स त्यांचे व्हर्चुअल कॅरेक्टर बदलण्यास सक्षम असतील. कंपनीचा नवीन 3D अवतार त्याच्या मेटाव्हर्सपासून प्रेरित आहे.
नवीन 3D अवतारमध्ये युजर्स त्यांचा चेहरा, बॉडी टाईप, कपड्यांची स्टाईल इत्यादी लक्षात घेऊन त्यांचा स्वतःचा 3D व्हर्चुअल अवतार तयार करू शकतील. हे 3D अवतार स्टिकर्स, फीड पोस्ट आणि फेसबुक प्रोफाइल पिक्चरमध्ये वापरले जाऊ शकतात.