आता नवीन अंदाजात आला गुगल प्ले स्टोर

आता नवीन अंदाजात आला गुगल प्ले स्टोर
HIGHLIGHTS

नवीन डिझाईनमध्ये अॅप्स डिस्प्लेची पद्धत बदलली आहे. नवीन डिझाईनमध्ये कंपनीने ह्याला अजून स्पष्ट आणि सोयीस्कर बनवण्याचा प्रयत्न केला आहे. अॅप्लीकेशनला आता उपयुक्तता आणि मनोरंजनच्या अनुसार ठेवण्यात आले आहे.

गुगलने आपल्या अॅनड्रॉईड अॅप स्टोर ज्याला प्ले स्टोरच्या नावाने ओळखले जाते , त्याला नवीन डिझाईनमध्ये सादर केले आहे. ह्या नवीन डिझाईनला आजच सादर केले गेले आहे. गुगल प्ले स्टोरचे नवीन डिझाईन अॅनड्रॉईड फोनसाठी उपलब्ध झाले आहे. गुगलने काही ग्राहकांसाठी नवीन इंटरफेसचे रोलआऊट सुरु केले आहे. लवकरच हा सर्व डिवाईसमध्ये उपलब्ध होईल.

 

नवीन अॅप्स डिस्प्ले

जर नवीन डिझाईनविषयी बोलायचे झाले तर, ह्यात काही जास्त बदल केला गेला नाहीय. मात्र तरीही हा जुन्या डिझाईनपेक्षा थोडा वेगळा आहे. नवीन डिस्प्लेमध्ये अॅप्स डिस्प्लेची पद्धत थोडी बदलली आहे. नवीन डिझाईनमध्ये कंपनीने ह्याला अजून स्पष्ट आणि सोयीस्कर बनवण्याचा प्रयत्न केला आहे. अॅप्लीकेशनला आता उपयुक्तता आणि मनोरंजनच्या अनुसार ठेवण्यात आले आहे.

अॅनिमेशनचा वापर

नवीन डिझाईनमध्ये अॅनिमेशनचा बराच वापर केला गेला आहे. गुगल प्ले स्टोरच्या ह्या नवीन थीममध्ये ग्राहकांना अॅनिमेशन पाहायला मिळेल. त्याचबरोबर गुगलने रीड मोअर पर्यायाच्या वर अॅनड्रॉईड वियरसाठी एक आयकॉनसुद्धा उपलब्ध केला आहे. रीड मोअरवर क्लिक केल्यावर तुम्ही अॅपची सविस्तर माहिती वाचू शकता.

 

दोन टॅबचा समावेश

ह्या नवीन डिझाईनमध्ये प्ले स्टोरमध्ये २ टॅब दिले गेले आहे- अॅप्स आणि इंटरनेट. ह्या अॅप्सच्या अंतर्गत आपण कॅटेगरी शोधू शकता. ज्यात टॉप चार्ट, फॅमिली आणि गेम्स इत्यादींचा समावेश आहे. तेथेच इंटरनेट विभागात न्यूजस्टँड, संगीत,पुस्तके, चित्रपट आणि टीव्हीचा समावेश आहे.

हल्लीच गुगलने आपल्या लोगोमध्ये बदल केला होता.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo