आता युजर्सने आपल्या पेटीएम वॉलेटला ATM च्या माध्यमातून रिचार्ज करु शकणाराय. त्याचबरोबर कंपनी ह्या नवीन वैशिष्ट्यासाठी इतर बँकांशीसुद्धा चर्चा करत आहे.
मोबाईल कॉमर्स प्लॅटफॉर्म पेटीएमने बँक ऑफ महाराष्ट्रसह आपल्या युजर्ससाठी एक नवीन वैशिष्ट्य सुरु केलं आहे, ज्याच्या माध्यमातून वापरकर्ते आपल्या पेटीएम वॉलेटला ATM च्या माध्यमातून रिचार्ज करु शकतील. त्याचबरोबर कंपनी ह्या नवीन वैशिष्ट्यासाठी इतर बँकांशीसुद्धा चर्चा करत आहे. भारतात बँक ऑफ महाराष्ट्रचे १८०० पेक्षा जास्त ATM आहेत. जेथून युजर्स आपल्या पेटीएम वॉलेटला रिचार्ज करु शकतील. ह्या नवीन वैशिष्ट्याला कंपनी पुढील काही वर्षांत पुर्ण देशभरात सुरु करेल.
संपुर्ण देश कॅशलेस सेवा वापरु शकेल, हे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवत पेटीएमने हे नवीन फीचर बनवले आहे. कंपनीचे असे मत आहे की, ही नवीन सुविधा लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल.
पेटीएमला पेमेंट बँकेचा परवाना प्राप्त आहे. त्याच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यात १० करोड लोक ७.५ करोड रुपयांचे भरणा देतात.
अलीकडेच मोबाईल कॉमर्स प्लॅटफॉर्म पेटीएमने आपली पहिली फेस्टिव सेल सादर केली होती. ह्या सेलमध्ये पेटीएम आपल्या सर्व प्रोडक्ट्संना उत्कृष्ट किंमतीत घेऊन आला होता. ह्या सेलच्या अंतर्गत डिस्काउंटपासून कॅशबॅकपर्यंत, पेटीएम ग्राहक उत्कृष्ट सौद्यांची अपेक्षा करु शकतो. इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, फुटवेअर, होम अँड किचन, गिफ्टस अँड स्वीट्स सारखे अनेक विभागातील उत्पादन ह्या सेलवर उपलब्ध होतील.