दरवर्षी प्रत्येक बाही रक्षाबंधनाची वाट बघत असते. तसेच, प्रत्येक बहीण या दिवसासाठी खास तयारी करत असते. मात्र, इतर सर्व गोष्टींमध्ये राखी घ्यायच लक्षातच राहत नाही. जर तुमचा भाऊ तुमच्यापासून लांब राहत असेल तर, रक्षाबंधनाच्या दिवशी राखी त्याकडे पोहोचायला हवी, या गोष्टीचे एक वेगळेच टेन्शन असते. मात्र, आता तुम्ही काही काळजी करू नका. ऑनलाइन सेम डे डिलेव्हरी ऍप या परिस्थितीत खूप फायदेशीर ठरतात. रक्षाबंधनाला आता फक्त दोनच दिवस उरले आहेत, आम्ही तुम्हाला अशाच काही ऍप्सबद्दल सांगणार आहोत, जे एका दिवसात तुमच्यापर्यंत राखी पोहोचवण्याचा दावा करतात.
या प्लॅटफॉर्मच्या जाहिराती आपण नेहमीच बघत असतो. प्लॅटफॉर्मचा दावा आहे की, ते तुमची भेटवस्तू किंवा राखी 2 तासांत त्याच्या योग्य ठिकाणावर पोहोचवेल. यासाठी तुम्हाला बाजारात जाण्याचीही गरज भासणार नाही. या ऍपवर तुम्हाला गिफ्ट हॅम्पर, कॉम्बो, मिठाई आणि चॉकलेट्स, फ्लॉवर्स इ. भेटवस्तू देखील पाठवता येतील.
ऑनलाइन शॉपिंगसाठी लोकप्रिय ऍप Amazon तुम्हाला सेम डे डिलिव्हरीसाठी सर्वोत्तम पर्याय देत आहे. त्यावर तुम्हाला राखीसोबत फ्लॉवर्स बुके, भेटवस्तू इ. पाठवता येतील. जर तुम्ही प्राइम मेंबर असाल तर तुम्हाला डिलिव्हरी शुल्क देखील लागणार नाही.
हे ऍप तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. यावर तुम्हाला भेटवस्तू खरेदी करण्याचे अनेक पर्याय मिळतात. हे ऍप देखील तुमची राखी तुमच्या भावापर्यंत लवकरात लवकर पोचवणार आहे. तुम्ही हे ऍप यासाठी ट्राय करू शकता.
विन्नी ऍपद्वारे तुम्ही तुमच्या भावा आणि बहिणीला फोटो फ्रेमपासून चॉकलेट्स भेट देऊ शकता. तुम्हाला यावर अगदी किफायतशीर किमतीत वस्तू मिळतील. तुम्हाला इथे बजेटमध्ये अनेक पर्याय मिळतात.