भारीच की! प्रेक्षकांना Amazon Prime Video पाहण्यात येईल आता खरी मज्जा, AI सह नवीन फीचर्स दाखल 

भारीच की! प्रेक्षकांना Amazon Prime Video पाहण्यात येईल आता खरी मज्जा, AI सह नवीन फीचर्स दाखल 
HIGHLIGHTS

Amazon Prime Video प्लॅटफॉर्म स्ट्रीमिंग अनुभव आणखी उत्तम बनवण्याच्या उद्देशाने अनेक अपडेट सादर करत आहे.

सुधारित स्ट्रीमिंग एक्सपरीयंसमध्ये तुम्ही नवीन ॲनिमेशन, स्मूथ पेज ट्रांझिशन आणि झूम इफेक्ट्स पाहू शकता.

Prime Video टीव्ही शो आणि चित्रपटांचे वर्णन सुलभ करण्यासाठी मोठ्या भाषा मॉडेल्स (LLMs) वापरत आहे.

भारतातील प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध असलेले OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video मोठ्या प्रमाणावर युजर्सना मनोरंजन ऑफर करत आहे. या प्लॅटफॉर्मने लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म्सच्या यादीत स्वतःचे नाव अग्रस्थानी नोंदवले आहे. आता Amazon Prime Video प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांसाठी पाहण्याचा अनुभव आणखी उत्तम बनवण्याच्या उद्देशाने अनेक अपडेट सादर करत आहे.

चला तर मग रसिक प्रेक्षकांनो जाणून घेऊयात, आता Amazon Prime Video मध्ये नवीन काय आहे आणि हे बदल तुमच्या स्ट्रीमिंग अनुभवाला आतापर्यंतचा सर्वोत्तम कसा बनवतील? Prime Video ने जुन्या मॉडेल्ससह सर्व उपकरणांसाठी अनुभव सुधारला आहे, प्रत्येकजण पुढील सुधारणांचा लाभ घेऊ शकतो.

Also Read: प्रतीक्षा संपली! अखेर इंटरनेटशिवाय वापरता येईल WhatsApp, लवकरच येणार सर्वोत्कृष्ट फीचर

Amazon Prime Video releases enhanced streaming experience: Here's what's new

Add-on सबस्क्रिप्शन्स

आता तुम्ही नेव्हिगेशन बारमधून तुमचे ऍक्टिव्ह ॲड-ऑन सबस्क्रिप्शन सहजपणे ब्राउझ, साइन अप किंवा मॅनेज करू शकता. तुम्ही ‘सबस्क्रिप्शन्स’वर क्लिक करून 20 पेक्षा जास्त ॲड-ऑन सबस्क्रिप्शनबद्दल माहिती पाहू शकता. हा सेक्शन तुम्ही आधीपासून कशाची सदस्यता घेतली आहे, त्याच माहिती दर्शवेल.

तसेच, तुमच्या आवडी, रेंटल्स आणि व्युइंग हिस्ट्री यावर आधारित नवीन पर्याय सुचवतो. याव्यतिरिक्त, तुम्हाला थर्ड पार्ट सर्व्हिसेसमधील डील आणि सवलतीचे बंडल एकाच सोयीस्कर ठिकाणी मिळतील.

कंटेंट फॉरवर्ड नेव्हिगेशन बार

तुम्ही Prime Video ओपन करता तेव्हा, तुम्हाला एक नवीन नेव्हिगेशन बार दिसेल. या बारद्वारे तुम्हाला काय पहायचे आहे ते शोधणे सोपे होईल. यात Home, Movies, TV Shows, Sports आणि Live TV असे सेक्शन आहेत. तुमच्याकडे Max किंवा Paramount+ सारख्या अतिरिक्त सदस्यत्वे असल्यास, तुम्हाला हे सेक्शन देखील तेथे सापडतील.

Amazon Prime Video releases enhanced streaming experience: Here's what's new

याव्यतिरिक्त, मेन पेजवर एक नवीन ‘प्राइम’ सेक्शन देखील दिसेल. जेथे तुम्ही आपल्या प्राइम सदस्यत्वासह विना अडथडा सर्व कंटेंट पाहू शकता. यामध्ये चित्रपट, टीव्ही शो, क्रीडा आणि LIVE ब्रॉडकास्ट यांचा समावेश देखील आहे. येथे तुम्ही इतर प्राइम फायद्यांविषयी माहिती मिळवू शकता. जसे की, खास डील्स आणि तुमच्या देशात उपलब्ध असलेले फायदे बघू शकता.

नेव्हिगेशन बारच्या खाली एक हिरो रोटेटर आहे, जो पाहण्यासाठी उपलब्ध असलेले सब्स्क्रिप्शन, रेंट आणि खरेदी करण्याच्या पर्याय दर्शवेल. हे सेक्शन विशेष जाहिराती, प्राइम मेंबर डील आणि सबस्क्रिप्शन बंडल देखील हायलाइट करते. या सेक्शनद्वारे तुम्ही कंटेन्ट खरेदी किंवा सबस्क्राईब करू शकता, यासह तुमचे आवडते चित्रपट आणि शोज पाहणे सोपे होईल.

Prime मेंबरशिप कंटेंट

पर्सनलाइझ केलेल्या रेकमेंडेशन हा नेहमीच प्राइम व्हिडिओचा मुख्य भाग राहिला आहे. आता, जनरेटिव्ह AI च्या मदतीने ही फीचर्स आणखी उत्कृष्ट झाली आहेत. ज्यामुळे हवे असलेले कंटेंट शोधणे सोपे झाले आहे. आता ‘Movies’ आणि ‘TV Show’ विभागात तुम्हाला ‘Made for You’ संग्रह सापडेल.

Amazon Prime Video releases enhanced streaming experience: Here's what's new

याव्यतिरिक्त, प्राइम व्हिडिओ टीव्ही शो आणि चित्रपटांचे वर्णन सुलभ करण्यासाठी मोठ्या भाषा मॉडेल्स (LLMs) वापरत आहे. याचा अर्थ तुम्ही शीर्षकाचा सारांश पटकन पाहू शकता आणि स्क्रोल न करता तुम्हाला ते पहायचे की नाही हे ठरवू शकता. त्याबरोबरच, आता तुमच्या प्राइम मेंबरशिपमध्ये काय समाविष्ट आहे आणि कशाची किंमत जास्त आहे, हे पाहणे आता आणखी झाले सोपे आहे. तुम्हाला एखाद्या टायटलसाठी अतिरिक्त पैसे देण्याची आवश्यकता असल्यास, एक पिवळा शॉपिंग बॅग चिन्ह देखील दिसेल.

सुधारित स्ट्रीमिंग एक्सपरीयंस

पुढे तुम्ही नवीन ॲनिमेशन, स्मूथ पेज ट्रांझिशन आणि झूम इफेक्ट्स पाहू शकता. जे स्ट्रीमिंगला आणखी मजेदार आणि भारी बनवतील. तुम्ही लिव्हिंग रूम डिव्हाईस वापरून ब्राउझ करत असताना, व्हिडिओ कंटेंट हिरो रोटेटरमध्ये प्ले होईल, जो एक इमर्सिव्ह अनुभव प्रदान करेल. रेकमेंड केलेले 24/7 स्टेशन ‘LIVE TV’ विभागात आपोआप प्ले होणे, सुरू होतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo