Special Offer! National Cinema Day निमित्त फक्त 99 रुपयांमध्ये सिनेमा बघण्याची संधी, ‘अशा’प्रकारे बुक करा तिकिटे

Updated on 12-Oct-2023
HIGHLIGHTS

13 ऑक्टोबर हा राष्ट्रीय चित्रपट दिन म्हणून साजरा केला जातो.

तुम्ही Paytm द्वारे मुव्ही तिकीट बुक करू शकता.

देशभरातील 4000 हून अधिक सिनेमा हॉलमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये तिकिटे मिळतील.

13 ऑक्टोबर हा राष्ट्रीय चित्रपट दिन म्हणजेच National Cinema Day म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुम्हाला अतिशय स्वस्त दरात नवीन चित्रपट बघण्याची संधी आहे. तुम्हीही नवीन चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर तुमच्या मित्रांसोबत लगेच प्लॅन करा आणि लगेच चित्रपटाचे तिकीट बुक करा. अन्यथा केवळ 99 रुपयांचे तिकीट तुमच्या हातून निघून जाईल.

हे सुद्धा वाचा: Amazon Sale मध्ये 55 इंच स्मार्ट टीव्हीवर बंपर Discount, अगदी स्वस्तात तुमचे घर बनेल थिएटर। Tech News

होय, मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या मते, सिनेपोलिस व्यतिरिक्त, लोकांना PVR INOX सह देशभरातील 4000 हून अधिक सिनेमा हॉलमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये तिकिटे मिळतील.

Paytm द्वारे तिकीट बुक करा

#image_title
  • सर्वप्रथम, फोनमधील Paytm ऍप ओपन करावे लागेल.
  • त्यानंतर, होमस्क्रीनवर थोडे खाली स्क्रोल करून. तिकीट बुकिंग सेक्शनमध्ये जा.
  • आता तुम्हाला ‘मुव्ही तिकीट’ पर्यायावर टॅप करावे लागेल.
  • आता तुम्हाला चित्रपटांच्या नावापुढे बुक पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा.
  • आता तुम्हाला 13 ऑक्टोबरच्या तारखेला क्लिक करावे लागेल.
  • यानंतर, सिनेमा हॉलच्या यादीतून तुमच्या आवडीचा सिनेमा हॉल निवडा आणि सीट निवडल्यानंतर पेमेंट करा.

लक्षात घ्या

एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, 99 रुपयांव्यतिरिक्त काही अतिरिक्त शुल्क जसे की सुविधा शुल्क आणि GST देखील आकारले जातील. लक्षात घ्या की, तुम्हाला सुविधा शुल्क टाळायचे असल्यास, तुम्हाला सिनेमागृहात जाऊन तिकीट खरेदी करावे लागेल. तसेच, 99 रुपयांची मूव्ही तिकीट ऑफर IMAX, 4DX आणि रिक्लिनर सीटसाठी उपलब्ध नाही.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :