कंपनीने अशी माहिती दिली आहे की, तो लवकरच ही VPN सुविधा कंम्प्यूटरच्या ओपेरा ब्राउजरवर उपलब्ध करेल.
ओपेरा सॉफ्टवेअरने iOS साठी पहिला VPN अॅप लाँच केला. ओपेरा VPN अॅप्लिकेशनला निशुल्क देणार आहे आणि त्यांनी असेही सांगितले आहे की, हा प्रतिबंधित सामग्रीपर्यंत यूजर्सला पोहोचण्यासाठी मदत करतो. ह्या अॅपच्या माध्यमातून यूजर्स ह्यातील ५ पैकी एक व्हर्च्युअल ठिकाण निवडू शकतात आणि ह्यात एक एड-ब्लॉकरसुद्धा दिला गेला आहे. त्याचबरोबर कंपनीने अशी माहिती दिली आहे की, हा लवकरच ह्या VPN सुविधेला कंम्प्यूटरच्या ओपेरा ब्राउजरवरसुद्धा उपलब्ध करेल.
आता आयफोन आणि आयपॅड यूजर्ससुद्धा ह्याच्या मदतीने बरीचशी माहिती आणि कंटेंटविषयी जाणून घेऊ शकतात, ज्यांच्यापर्यंत आपण पोहचू शकत नव्हतो.
कंपनीचे असे म्हणणे आहे की, आतापर्यंत अनेक लोक, विद्यार्थी आणि ऑफिसात काम करणारे लोक शाळा किंवा ऑफिसेसमध्ये सोशल मिडिया साइट्स जसे स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम आणि फेसबुकला ब्लॉक असल्यामुळे वापरु शकत नव्हते. मात्र आता ह्या अॅपच्या मदतीने आता आपल्याला तसे करता येईल.
iOS ओपेरा VPN कंपनीकडून पहिला फ्री VPN अॅप आहे. कंपनी लवकरच ह्या VPN सुविधेला कंम्प्यूटरला ओपेरा ब्राउजरवरही उपलब्ध करेल.
ह्या अॅपच्या मदतीने यूजर्स ह्यात व्हर्च्युअल लोकेशन निवडू शकतात, जे आहेत USA, कॅनडा, जर्मनी, सिंगापूर आणि नेदरलँड्स.