PAN कार्ड Aadhar शी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी केंद्र सरकारने 31 मार्च 2023 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. यानंतर तुमचे पॅन कार्ड रद्द होईल. जर पॅन कार्ड अवैध झाले तर बँकिंग व्यवहार करण्यात अडचण येऊ शकते. 50,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. तुमचे पॅन कार्ड अवैध ठरल्यास 31 मार्चनंतर 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो.
हे सुद्धा वाचा : Realme चा 32 इंच टीव्ही फक्त 2,849 रुपयांमध्ये खरेदी करा, ही ऑफर पुन्हा मिळणार नाही
जर तुम्ही 31 मार्च 2023 पर्यंत आधारशी पॅन लिंक केले तर तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. मात्र यानंतर तुमचा पॅन रद्द केला जाईल. तसेच, पॅन सक्रिय करण्यासाठी, लेट पेमेंट म्हणून 1000 रुपये दंड भरावा लागेल.
– सर्व प्रथम www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवर क्लिक करा.
– त्यानंतर डाव्या बाजूला Quick Links वर क्लिक करा.
– त्यानंतर Link Aadhaar पर्यायावर क्लिक करा.
– यानंतर एक नवीन पेज उघडेल, जिथे पॅन आणि आधार क्रमांक टाकावा लागेल.
– याच्या खाली उजव्या बाजूचे व्हॅलिडेट बटण क्लिक करावे लागेल.
– त्यानंतर नाव, जन्मतारीख आणि पत्त्याची पडताळणी होईल.
– त्यानंतर OTP व्हेरिफिकेशन आधारला पॅनशी लिंक करेल.
– सर्व प्रथम https://uidai.gov.in/ वेबसाइटवर जा.
– यानंतर आधार सर्व्हिस मेनूच्या Aadhaar Linking Status ला भेट द्या.
– त्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि गेट स्टेटस बटणवर टॅप करा.
– त्यानंतर पॅन नंबर आणि कॅप्चा कोड टाका.
– यानंतर Get Linking Status वर क्लिक करा.
– अशा प्रकारे पॅन आधारशी लिंक आहे की नाही हे निश्चित केले जाऊ शकते.