ऑनलाईन शॉपिंग साइट अॅमेझॉनने लवकरच लाँच होणा-या स्मार्टफोन वनप्लस X चा तपशील लीक केला आहे. खरे पाहता, ह्या स्मार्टफोनला काही काळासाठी अॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर लिस्ट केले होते, मात्र साइटवर कुठेही ह्या स्मार्टफोनच्या किंमती संदर्भात काही खुलासा केला नाही. ह्या संदर्भातील माहिती ट्रू-टेक वेबसाइटने दिली आहे.
जर ह्याच्या लिस्टिंगबद्दल बोलायचे झाले तर, ह्यात सांगितले गेले आहे की, वनप्लस X स्मार्टफोन मेटल फ्रेम फिनिशसह येईल आणि त्यात समाविष्ट असेल ‘साइडटच’ वैशिष्ट्य. ह्या वैशिष्ट्याचा वापर करुन वापरकर्ते स्क्रीनच्या उजव्या बाजूला स्पर्श करुन अॅप्स किंवा कॅमेरा सेटअप लाँच करु शकतात. त्याचबरोबर हा सिनेप्टिक्सच्या क्लियरफोर्स टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे, जो आयफोन 6s च्या फोर्स टच डिस्प्ले सारखा काम करतो. त्याचबरोबर ह्यात ५ इंचाची पुर्ण HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन १०८०x१९२० पिक्सेल आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता ४०१ppi आहे. डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ ने संरक्षित केले आहे.
त्याचबरोबर ह्यात स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक MT6795 चिपसेट आणि २जीबी रॅमने सुसज्ज आहे. ह्यात ३२ जीबीचे अंतर्गत स्टोरेज असेल. ह्यात सोनी IMX258सेंसरचा १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये २४५०mAh ची बॅटरीसुद्धा असू शकते. वनप्लस X किंवा वनप्लस मिनी ऑक्सिजन ओएस ३.० वर चालेल, जो अॅनड्रॉईड ६.० मार्शमॅलोवर आधारित आहे. ह्याच्या कनेक्टिव्हीटी बद्दल बोलायचे झाले तर वनप्लस X FM रेडियो, NFC आणि IR ब्लास्टर सोबत येईल.