Servify ने लाँच केला पॉवर्ड वनप्लस केयर अॅप

Servify ने लाँच केला पॉवर्ड वनप्लस केयर अॅप
HIGHLIGHTS

Servify सर्व वनप्लस 3 स्मार्टफोनला खरेदी करणा-या ग्राहकांसाठी १२ महिन्यांसाठी कॉम्प्लिमेंटरी एक्सीडेंटल डॅमेज कवर करुन देणार.

वनप्लसने वनप्लस केयर अॅपला Servify सह मिळून लाँच केले आहे. Servify एक पर्सनल डिवाइस असिस्टंस प्लॅटफॉर्म आहे. ह्या प्लेटफॉर्मच्या माध्यमातून वनप्लस डिवाइसचे यूजर्स आपल्या स्मार्टफोन्सचे सेल्फ-डायग्नोज करु शकतात. त्याचबरोबर त्यांच्या घरापासून ते ऑफिसपर्यंत मोफत पिकअप-ड्रॉप सर्विस केली जाईल. ही सेवा बंगळूरु, चेन्नई, कोलकता, नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये लागू करण्यात आली आहे.

Servify सर्व वनप्लस 3 स्मार्टफोनला खरेदी करणा-या ग्राहकांसाठी १२ महिन्यांसाठी कॉम्प्लिमेंटरी एक्सीडेंटल डॅमेज कवर करुन देणार. ह्यासाठी यूजर्सला वनप्लस केयर अॅप डाऊनलोड करावा लागेल आणि एक्सीडेंटल डॅमेज कवर करावे लागेल. मात्र ह्याला आपण सुरुवातीच्या ३० दिवसांतच करु शकतो.

ह्या नवीन भागीदारीमुळे वनप्लस यूजर्सला चांगली डाटा सुरक्षा मिळेल. त्याचबरोबर सर्विस अलर्टसुद्धा मिळेल.

हेदेखील वाचा – उत्कृष्ट मेटल बॉडीसह येणारे हे आकर्षक स्मार्टफोन्स आता भारतातही झाले उपलब्ध…

ह्या सेवेविषयी अधिक माहिती देताना वनप्लस इंडियाचे GM विकास अग्रवाल यांनी सांगितले की,  “वनप्लस ह्या प्रकारची सेवा लाँच केल्यानतर आतापर्यंतचा नंबर वन ब्रांड बनला आहे. ह्या प्रकारचा अॅप आमच्या आधी कोणीही लाँच केला नाही. ह्या माध्यमातून यूजर्सला बरीच मदत होणार आहे.”

 

हेदेखील वाचा – LYF अर्थ 2 स्मार्टफोन लाँच, किंमत २०,९९९ रुपये

हेदेखील वाचा – मोटो Z, मोटो Z फोर्स स्मार्टफोन्स सप्टेंबरमध्ये होणार भारतात लाँच?

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo