व्यक्तिगत परिवहन सुविधा देणारी कंपनी ओलाने आपली सोशल राइड-शेअरिंग सुविधा लाँच केली आहे. देशात पहिल्यांदाच अशी वेगळी सुविधा सुरु करण्यात आली आहे. ह्या नवीन सुविधेच्या लाँचसह ओलाच्या टॅक्सीचा वापर पहिल्यापेक्षा जास्त स्वस्त होईल, कारण वापरकर्ता कमीत कमी दोन इतर वापरकर्त्यांसह प्रवासाचे भाडे शेअर करण्यास सक्षम असेल आणि त्यामुळे पैसेही वाचतील. ह्या सुविधेमुळे जसा वापरकर्ता ओला अॅपवर शेअर राइडसाठी रिक्वेस्ट पाठवेल, त्याला त्याच मार्गाने जाणा-या ग्रुपच्या इतर वापरकर्त्यांसोबत जोडले जाईल.
ही नवीन सुविधा ओला शेअर सर्वात आधी बंगळूरूमध्ये सुरु केली जाईल. त्यानंतर ही सुविधा पुढील तीन महिन्यांत पाच अन्य शहरांत सुरु केली जाईल. ग्राहक बंगळूरुमध्ये कोणत्याही ठिकाणी, कुठल्याही प्रवासात फक्त ५० रुपयाच्या मूळ भाड्यासह ओला शेअरचा वापर करु शकता.
ह्या सुविधेचा फायदा कसा घ्याल?
तुम्हीही ह्या नवीन सुविधेचा फायदा घेऊ इच्छिता, तर आपल्याला सर्वात आधी ह्या सोशल ग्रुपचा भाग बनावे लागेल आणि त्या ग्रुपला जॉईन करावे लागेल. आपण ज्या ग्रुपचा भाग बनाल, त्याच्या वापरकर्त्यांसह प्रवास करु शकाल. प्रवासी भाडे शेअर करण्यासाठी तुम्हाला अनोळखी लोकांसोबत प्रवास करावा लागणार नाही, तसेच त्यांची गुप्त माहितीसुद्धा पडताळून पाहिली जाईल. ह्यासाठी ओलाने आपल्या अॅपवर सोशल ग्रुपची कल्पना पुढे आणली. ह्या ग्रुपच्या माध्यमातून एकाच ठिकाणी काम करणारे सहकर्मचारी आणि एकाच कॉलेजचे मित्र एकत्र प्रवास करु शकतात. ह्या सुविधेअंतर्गत कोणताही वापरकर्ता एकाच वेळी अनेक ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकतो आणि कोणत्याही ग्रुपच्या सदस्याशी राइड शेअर करु शकतो.