WhatsApp UPI: नुकतेच म्हणजेच नवीन वर्ष सुरू होण्याच्या केवळ 1 दिवस आधी NPCI म्हणजेच National Payments Corporation of India ने लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ला नवीन वर्षाचे गिफ्ट दिले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, NPCI ने WhatsApp वरील UPI साठी युजर्स ऑनबोर्डिंग लिमिट काढून टाकली आहे. लक्षात घ्या की, ही लिमिट काढून टाकल्यानंतर व्हॉट्सॲप आता संपूर्ण भारतातील युजर्सना त्यांची UPI सेवा प्रदान करण्यास सक्षम झाले आहे. जाणून घेऊयात संपूर्ण तपशील-
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, NPCI ने आपल्या अधिकृत X म्हणेजच ( पूर्वीच्या Twitter) हँडलद्वारे या नव्या अपडेटबद्दल माहिती शेअर केली आहे. NPCI ने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “WhatsApp पे (TPAP) साठी UPI वापरकर्ता ऑनबोर्डिंग मर्यादा त्वरित प्रभावाने काढून टाकली जात आहे. व्हॉट्सॲप आता भारतभरातील युजर बेसला UPI सेवा पुरवण्यास सक्षम आहे. अर्थातच, सर्व यूजर्स आता WhatsApp Pay वापरण्यास सक्षम असतील. तुम्ही खाली पोस्टमध्ये देखील सर्व माहिती पाहू शकता.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, यापूर्वी NPCI ने WhatsApp वर UPI यूजर ऑनबोर्डिंग मर्यादा लागू केली होती. या मर्यादेअंतर्गत WhatsApp केवळ टप्प्याटप्प्याने आपला UPI वापरकर्ता आधार वाढवू शकतो. याआधी ही सेवा अतिशय कमी वापरकर्त्यांसाठी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर, 2022 मध्ये WhatsApp Pay चा युजर बेस 100 दशलक्षपर्यंत वाढवण्यात आलं. यात, आता NPCI ने व्हॉट्सॲपला नवीन वर्षाची भेट देताना ही लिमिट पूर्णपणे रिमूव्ह केली आहे.