NPCI कडून WhatsApp ला New Year गिफ्ट! आता सर्व युजर्सना करता येईल UPI पेमेंट, मर्यादा हटवली
NPCI ने लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ला नवीन वर्षाचे गिफ्ट दिले आहे.
NPCI ने WhatsApp वरील UPI साठी युजर्स ऑनबोर्डिंग लिमिट काढली.
WhatsApp आता भारतभरातील युजर बेसला UPI सेवा पुरवण्यास सक्षम आहे.
WhatsApp UPI: नुकतेच म्हणजेच नवीन वर्ष सुरू होण्याच्या केवळ 1 दिवस आधी NPCI म्हणजेच National Payments Corporation of India ने लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ला नवीन वर्षाचे गिफ्ट दिले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, NPCI ने WhatsApp वरील UPI साठी युजर्स ऑनबोर्डिंग लिमिट काढून टाकली आहे. लक्षात घ्या की, ही लिमिट काढून टाकल्यानंतर व्हॉट्सॲप आता संपूर्ण भारतातील युजर्सना त्यांची UPI सेवा प्रदान करण्यास सक्षम झाले आहे. जाणून घेऊयात संपूर्ण तपशील-
WhatsApp UPI
NPCI has removed the UPI user onboarding limit for WhatsApp Pay (TPAP), with immediate effect. With this development, WhatsApp Pay can now extend UPI services to its entire user base in India.
— NPCI (@NPCI_NPCI) December 31, 2024
For more information, visit https://t.co/Qg6nrFlTcc
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, NPCI ने आपल्या अधिकृत X म्हणेजच ( पूर्वीच्या Twitter) हँडलद्वारे या नव्या अपडेटबद्दल माहिती शेअर केली आहे. NPCI ने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “WhatsApp पे (TPAP) साठी UPI वापरकर्ता ऑनबोर्डिंग मर्यादा त्वरित प्रभावाने काढून टाकली जात आहे. व्हॉट्सॲप आता भारतभरातील युजर बेसला UPI सेवा पुरवण्यास सक्षम आहे. अर्थातच, सर्व यूजर्स आता WhatsApp Pay वापरण्यास सक्षम असतील. तुम्ही खाली पोस्टमध्ये देखील सर्व माहिती पाहू शकता.
WhatsApp Pay चा वापर कसा करावा?
- सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये WhatsApp ओपन करा. यानंतर, तुम्हाला टेक्स्ट विभागात जावे लागेल.
- यानंतर, अटॅचमेंट्स चिन्हावर क्लिक करा. येथे तुम्हाला WhatsApp चे अनेक फीचर्स बघायला मिळतील.
- येथून तुम्ही पेमेंट पर्याय निवडून तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना पेमेंट करण्यास सक्षम असाल.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, यापूर्वी NPCI ने WhatsApp वर UPI यूजर ऑनबोर्डिंग मर्यादा लागू केली होती. या मर्यादेअंतर्गत WhatsApp केवळ टप्प्याटप्प्याने आपला UPI वापरकर्ता आधार वाढवू शकतो. याआधी ही सेवा अतिशय कमी वापरकर्त्यांसाठी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर, 2022 मध्ये WhatsApp Pay चा युजर बेस 100 दशलक्षपर्यंत वाढवण्यात आलं. यात, आता NPCI ने व्हॉट्सॲपला नवीन वर्षाची भेट देताना ही लिमिट पूर्णपणे रिमूव्ह केली आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile