WhatsApp आपल्या यूजर्ससाठी सतत नवनवीन फीचर्स आणत आहे. आजकाल प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे संपर्कांशी कनेक्ट राहणे अवघड आहे. जर तुमच्या मित्र-मैत्रिणीने स्टेटस अपलोड केल्यास तुम्ही ते सीन करता, पण त्यावर वेळेवर रिप्लाय करायला तुम्हाला बरेचदा जमत नाही. आपल्या युजर्सची हीच गरज लक्षात घेऊन WhatsApp ने नुकतेच स्टेटस अपडेटसाठी एक नवीन फीचर आणले आहे. आता युजर्सना स्टेटस अपडेट्सवरही प्रतिक्रिया देण्याची सुविधा मिळणार आहे.
Also Read: आगामी Moto G45 5G ची भारतीय लाँच डेट कन्फर्म! Powerful फीचर्स देखील उघड, बजेटमध्ये असेल का किंमत?
होय, लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप WhatsApp ‘लाइक रिॲक्शन फीचर’ आणत आहे. मात्र, तो फक्त निवडक लोकांसाठी सुरू करण्यात आला आहे. सध्या सर्व वापरकर्ते ते वापरू शकत नाहीत. WhatsApp च्या आगामी अपडेटसह हे फिचर सर्व वापरकर्त्यांसाठी रोलआऊट केले जाईल.
वरील रिपोर्टमध्ये दिलेल्या स्क्रीनशॉटनुसार, आता बीटा यूजर्स WhatsApp वर त्यांच्या कॉन्टॅक्ट्सने पोस्ट केलेल्या स्टेटस अपडेटवर लाईक रिॲक्शन देऊ शकतील. यासाठी त्यांना रिप्लाय ऑप्शनच्या उजव्या बाजूला लाईक किंवा हार्ट बटण मिळेल, असे दिसत आहे. यावर क्लिक केल्यावर, कॉन्टॅक्टला एक नोटिफिकेशन मिळेल की कोणीतरी त्यांचे स्टेटस लाईक केले आहे.
स्टेटस लाईक करणाऱ्या सर्व युजर्सची यादीही तयार केली जाईल. याच्या मदतीने तुमचे स्टेटस कोणी लाईक केले आहे हे सहज पाहता येते. हे फिचर जवळपास इंस्टाग्राम स्टोरी लाईक रिऍक्शन फीचर्ससारखे कार्य करेल. वर सांगितल्याप्रमाणे, हे फीचर आगामी काळात व्हॉट्सॲपच्या सर्व वापरकर्त्यांसाठी आणले जाईल. सध्या, ते फक्त बीटा चाचणीसाठी उपलब्ध आहे. त्याच्या मदतीने, वापरकर्ते आता रिप्लाय न देता कमी वेळेत स्टेटसवर सहजपणे प्रतिक्रिया देऊ शकतील आणि यासह तुमचे संपर्क तुमच्याशी सहज कनेक्ट राहू शकतात.