मेटा-मालकीचे मेसेजिंग ऍप व्हॉट्सऍप एक नवीन ऍप प्रोग्रामिंग इंटरफेस (API) आणण्याची योजना करत आहे. ज्यामुळे डू नॉट डिस्टर्ब फिचर सक्रिय आहे की नाही हे ओळखता येईल. हे फिचर सर्वप्रथम iOS प्लॅटफॉर्मवर WhatsApp बिझनेस युजर्ससाठी आणले जाईल.
हे सुद्धा वाचा: Samsung Galaxy F13 22 जून रोजी भारतात लाँच होईल, बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
WABetaInfo च्या अहवालानुसार, आगामी फिचर प्रथम iOS प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या WhatsApp Business वर आणले जात आहे. टेस्टफ्लाइटवर iOS साठी WhatsApp बीटावर पाहिले गेले की, WhatsApp आता अजून एका iOS 15 API ला सपोर्ट करतो.
हे सुद्धा वाचा: इंटरनेटशिवाय बघा चित्रपट आणि OTT कंटेंट, Video अजिबात थांबणार नाही
या API मध्ये आयफोनवर डू नॉट डिस्टर्ब पर्याय सक्षम आहे की नाही हे शोधण्याची क्षमता आहे. एका स्क्रिनशॉटद्वारे हे समजले की, जेव्हाही तुम्हाला व्हॉट्सऍप कॉल येतो आणि तुम्ही नोटिफिकेशन चुकवता कारण डू नॉट डिस्टर्ब मोड सक्षम आहे, तेव्हा तुम्हाला आता या कॉल्ससमोर एक लेबल दिसेल.
WhatsApp वरील कॉल हिस्ट्रीमध्ये, हे लेबल सूचित करेल की तुम्ही कॉल मिस केला कारण डिस्टर्ब मोड ऍक्टिव्ह होता. अहवालात असे म्हटले आहे की, ही माहिती किंवा कॉलरची माहिती व्हॉट्सऍपवर शेअर केली जात नाही, कारण ती फक्त ऍपच्या स्थानिक डेटाबेसमध्ये स्टोअर केली जाते. हे फिचर मिळवण्यासाठी, तुमच्या iPhone किमान iOS 15 सुरु असले पाहिजे कारण ते एक iOS 15 API आहे.