अॅनड्रॉईड यूजर्ससाठी मायक्रोसॉफ्टने आणला नवीन कीबोर्ड अॅप

अॅनड्रॉईड यूजर्ससाठी मायक्रोसॉफ्टने आणला नवीन कीबोर्ड अॅप
HIGHLIGHTS

द हब कीबोर्ड हा प्रायोगिक मायक्रोसॉफ्ट गॅरेज प्रोजेक्टचा एक भाग आहे.

ज्यांच्याजवळ विंडोज नाही, अशांसाठी मायक्रोसॉफ्टने हा नवीन अॅप बनवला आहे. ह्या नवीन अॅनड्रॉईड अॅपचे नाव आहे हब कीबोर्ड. हे खास अॅनड्रॉईड कीबोर्डसाठी बनविण्यात आले आहे. हे प्रायोगिक मायक्रोसॉफ्ट गॅरेज प्रोजेक्टचा एक भाग असून, हा यूजरला त्वरित ऑफिस फाइल्स, संपर्क, लोकल क्लिपबोर्ड एवढच नव्हे तर, टूल भाषांतरासाठी मदत करतो.

 

द हब कीबोर्ड च्या वरच्या बाजूस एक छोटा बार आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या फोनमधील इतर अॅपमधील माहिती वापरता येते. त्यामुळे तुम्ही कोणतीही माहिती अॅप न उघडता मिळवू शकता. उदाहरणार्थ,  तुम्ही एखादा संपर्क शोधत असाल, आणि तुम्ही जे टाइप करत आहात, त्यात तुम्हाला हा फोन क्रमांक टाकायचा असेल किंवा तुम्ही जे टाइप करत अाहात, त्याचे इंग्रजीमधून इतर भाषांमध्ये  भाषांतर करण्यासाठी तुम्हाला ट्रान्सलेट पर्याय वापरायचा असल्यास हा अॅप तुम्हाला मदत करतो.

मायक्रोसॉफ्टने अलीकडेच आयफोनसाठी सुद्धा स्वतंत्र असे कीबोर्ड बनवले. हा कीबोर्ड एकटा यूजर अगदी सहजपणे हाताळू शकतो.

 

हेदेखील वाचा – MWC 2016 : गुगलचा पहिला मिड रेंज स्मार्टफोन ‘अॅनड्रॉईड वन’ लाँच

हेदेखील वाचा – असा आहे शाओमी Mi 5: पाहा खास झलक

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo